जगभरातले हे पाच अजबगजब बेडरूम, आपणही पाहून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 04:33 PM2019-02-06T16:33:50+5:302019-02-06T16:38:13+5:30

वॉटर स्‍लाइडचं बेडरूम- मालदीवमधलं सोनेवा जानी बेडरूम फारच सुंदर आहे. या बेडरूममधलं वॉटर स्लाइड आणि रिट्रॅक्टेबल रूफ अद्भुत आहे.

समुद्राच्या खडकातील बेडरूम- स्पेनच्या मॉलोरकामध्ये कॅप रॉकेट बेडरूमही फार वेगळं आहे. या खडकामध्ये एकमेकांना लागून बेडरूम दिलेले आहेत.

दक्षिण आफ्रिकेतल्या लॉयन सेंड्स गेम रिझर्व्हच्या एका झाडावर बेडरूम आहे. किंग्स्टन ट्री हाऊसमध्ये तयार केलेला हा बेडरूम अनोखा आहे.

इंडोनेशियामध्ये निही सुंबा हा बेडरूम एका लाकडावर तयार झालेला आहे. यात चार मोठ-मोठ्या आकाराचे पलंग आहेत.

मॅक्सिकोच्या रिव्हिएरामध्ये एक वेगळाच बेडरूम आहे. हा बेडरूम एखाद्या गुंफेसारखा भासतो.