'ही' आहेत जगातील मोठी धार्मिक स्थळे, भव्यता पाहून दिपतात डोळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 16:47 IST2019-10-28T16:39:08+5:302019-10-28T16:47:59+5:30

जगभरातील अनेक धार्मिक स्थळं आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. जाणून घेऊया असाच 5 धार्मिक स्थळांबाबत...
ब्योदो इन टेंपल, हवाई, अमेरिका
हवाईमध्ये पहिल्या जपानी कामगारांच्या पोहोचण्याच्या 100व्या जयंतीचे औचित्य साधून 1960मध्ये हे मंदिर बांधण्यात आलं होतं. हे क्योटो, जपानच्या बाहेरील सिमेवर स्थित असलेलं हे मंदिर 950 वर्ष जुनं आहे.
अल अकसा मस्जिद, जेरुसलेम
ही मशीद इस्लामच्या तीव पवित्र स्थळांपैकी एक आहे. ही जेरुसलेममध्ये स्थित आहे. (Image Credit : My Jewish Learning)
जिंगू, जापान
आठव्या शतकात तयार केलेलं हे पवित्र स्थळ जपानमध्ये आहे. हे हाचिमनला समर्पित करण्यात आलेलं आहे. हाचिमन म्हणजेच, ज्यांना धनुर्विद्या आणि युद्धाचं दैवत. (Image Credit : Savvy Tokyo)
कन्फ्यूशियस मंदिर, तैवान
कन्फ्यूशियस चीनमधील महान विचारक आणि शिक्षक होते. तैवानमध्ये त्यांना समर्पित करण्यात आलेलं एक टेम्पल आहे. जे 11व्या शतकात तयार करण्यात आलेलं आहे.
श्री महामरियम्मन मंदिर, थाइलँड
बँकॉकमधील हे मंदिर 150 वर्ष जुनं आहे. हे मंदिर मरियम्मन देवीला समर्पित आहे. मरियम्मन देवीला दक्षिण भारतात पावसाचं दैवत मानलं जातं. (Image Credit : timeout.com)