श्रावण स्पेशल : चक्क शिवलिंगासारखं दिसतं 'हे' शहर; फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 17:57 IST2019-08-11T17:49:16+5:302019-08-11T17:57:10+5:30

इटलीमधील सेंट पीटर गिरिजाघरमध्ये वास्तुकलेचा उत्तम नमुना पाहायला मिळतो. खरं तर ही वास्तू इतर काहीही नसून एक म्युझियम आहे. 14.5 किलोमीटर परिसरात पसरलेलं हे म्युझिअम संपूर्ण पाहायचं असेल तर तुम्हाला तब्बल 4 दिवस लागतात.
1929 साली 110 एकर जमिनीवर सध्याचे व्हॅटिकन सिटी हे शहर उभारण्यात आलं. हे शहर ईसाई धर्माचं अत्यंत पवित्र स्थान आहे.
इटलीमधील वेटीकन सिटी हे शहर जगातील सर्वात छोटो शहर म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु आणखी एका गोष्टीसाठी हे शहर ओळखलं जातं ते म्हणजे, हे शहर जर नीट पाहिलं तर शिवलिंगासारखं दिसतं. त्यामुळे जगभरात हे शहर अत्यंत नावाजलेलं आहे.
आकाशातून पाहिलं तर व्हॅटीकन सिटी हे शहर हुबेहुब शिवलिंगाप्रमाणे दिसतं.
व्हॅटीकन सिटीच्या खोदकामावेळी एक शिवलिंग सापडले होते, जे एका म्युझियममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलं आहे. त्यामुळेही या शहराची रचना शिवलिंगाप्रमाणे केल्याचे सांगण्यात येते.
ख्रिस्ती धर्मियांचे पवित्र ठिकाणी आणि पोपचे निवासस्थान असलेल्या व्हॅटिकन सिटीमध्ये एकही गाव नाही. या देशाची लोकसंख्या केवळ 1 हजार एवढीच आहे.