हे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 03:13 PM2018-11-20T15:13:18+5:302018-11-20T19:06:44+5:30

दीपिका आणि रणवीरनंतर आता प्रियांका चोप्रा-निक जोनास यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली. देसी गर्ल प्रियांका आणि निक जोनास सुद्धा लग्नाच्या तयारीला लागले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, प्रियांका आणि निक २ डिसेंबरला जोधपूरच्या उम्मेद भवनमध्ये शाही समारंभात लग्न करणार आहेत. मात्र त्यांच्या लग्नाच्या व्हेन्यूबाबत अधिकृतपणे काही माहिती देण्यात आलेली नाहीये.

जोधपूरमधील याच उम्मेद भवनमध्ये अभिनेत्री Elizabeth Hurley ने लग्न केलं होते. तसेच बॉलिवूड स्टार्ससोबतच हॉलिवूड स्टार्सची ही आवडती जागा आहे. चला जाणून घेऊया की, उम्मेद भवनमध्ये अशी काय खासियत आहे की, प्रियांका चोप्राने लग्नासाठी ही जागा निवडली.

१) जोधपूरचा हा शाही महल जगातला सहावा सर्वात मोठा महल आहे. या भवनाचं नाव महाराज उम्मेद सिंह यांच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे.

२) एकेकाळी जोधपूर राजघराण्यातील सर्व लोक याच महालात राहत होते. या महलामध्ये एकूण ३४७ रुम्स आहेत. या रुम्स तीन भागात विभागल्या गेल्या आहेत. यातील एक भाग ताज हॉटेलचा भाग आहे. तर दुसरा फॅमिली म्यूझिअम आणि Palace Complex आहे.

३) या महलाची निर्मिती १९४३ मध्ये करण्यात आली होती. सुंदर आणि शाही अंदाजासाठी उम्मेद पॅलेसला 'The Best WOW effect' आणि २०१८ पॅरिसमध्ये Worldwide Hospitality Awards दिला गेलाय.

४) या महालाच्या बांधकामासाठी Palm Court दगड वापरला गेला आहे. याच दगडांचा वापर ताजमहल बांधतानाही केला गेला होता.

५) हॉलेटमध्ये ६४ भव्य रुम्स आणि Suites आहेत, जे वेगवेगळ्या पाच श्रेणींमध्ये विभागले आहेत.

६) प्रत्येक रुम पारंपारिक सजावट आणि आधुनिक सोयी-सुविधांचं एक कलात्मक संयोजन आहे. या हॉटेलच्या एका रुमचं एका रात्रीचं भाडं हे ४० हजार रुपये इतकं आहे. तेही दोन आठवड्यांपूर्वी बुकींग केली तरच.

७) महाराजा आणि महाराणीच्या या रुम्समधून अंगण आणि मेहरानगढ किल्ल्याचं सुंदर दर्शन घडतं.

८) इथे कपल किंवा सिंगल स्पा ची सुद्धा सुविधा आहे. यासाठी तुम्हाला १८ हजार रुपये किंमत मोजावी लागेल.

९) २६ एकरात हा महल पसरलेला असून अनेक सुंदर कलाकृती इथे बघायला मिळतात.