फिरायला गेल्यानंतर स्वस्तात मस्त हॉटेल हवं असेल तर 'हे' नक्की वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 05:23 PM2020-01-25T17:23:27+5:302020-01-25T17:36:58+5:30

जेव्हा आपण आपल्या कुटूंबीयांसोबत आनंदाचा वेळ घालवण्यासाठी एखाद्या पर्यटन स्थळी जात असतो. त्यावेळी त्या ठिकाणचं वातावरण आणि राहण्याची सोय जर उत्तम असेल आपली ट्रीप बेस्ट होते.

जर आपल्याला मनासारखं हॉटल हवं असेल तर खूप पैसे सुद्धा मोजावे लागतात. अनेक ठिकाणी शोधल्यानंतर आपल्याला मनासारखं हॉटेल मिळत असतं.

अलिकडेच आयआरसीटीसी ने एक नवीन पॅकेज लॉन्ज केले आहे. त्यानुसार तुम्हाला राहण्याची उत्तम सोय कमीत कमीत पैश्यात कशी करून देता येईल यावर काम केले जाणार आहे.

www.hotel.irctctourism.com या वेबसाईटवर चांगल्या दर्जाची हॉटेल्स कमी खर्चात तुम्हाला बूक करता येतील. जर तुम्ही ऑनलाईन बूक करत असाल तर अधिक सवलतीच्या दरात हॉटेल्स उपलब्ध होऊ शकतात.

www.hotel.irctctourism.com या वेबसाईवर हॉटेल रूम बूक केल्यास कॅन्सलेशनची सुविधा २४ तास आधी देण्यात येईल. जर फिरायला जाण्याच्या काही दिवस आधी बूकिंग केलं तर तुम्हाला चांगलं पॅकेज मिळू शकतं.

आईआरसीटीसी असा दावा करत आहे की फक्त हॉटेल्स नाही तर पर्यटकांसाठी आकर्षक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

आईआरसीटीसीच्या या खास पॅकेजचा वापर करून तुम्ही तुम्हाला हव्या तशा हॉटेलमध्ये राहू शकता.