शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हे आहे जगातलं सगळ्यात मोठं हिंदू मंदिर, यात अनेक आश्चर्यकारक गोष्टींची होत असते चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 2:27 PM

1 / 9
भारतात अनेक ठिकाणी देवी-देवतांची मंदिरं आहेत. भारतातील एखादं गाव किंवा शहर क्वचीतच असे असतील ज्या ठिकाणी मंदिर नाहीत. असं असून सुध्दा हिंदूचं सगळ्यात मोठं मंदिर भारतात नसून कंबोडीयात आहे.
2 / 9
या मंदिराचं नाव आहे अंकरकोरवाट मंदिर आहे. कंबोडियातील अंकोर या ठिकाणी हे मंदिर आहे. या मंदिराच जुनं नाव यशोदापुरा आहे. १२ व्या शतकात खामेर वंशाचा सम्राट दुसरा सुर्यवर्मन यांच्या काळात या मंदिराची उभारणी झाली.
3 / 9
तब्बल ४०२ एकरात हे मंदिर उभारण्यात आलं आहे. तसंच या मंदिराच्या भिंतीवर भारताच्या धर्मग्रंथातील प्रसंग चित्रण आहे.
4 / 9
जगातील सगळ्या लोकप्रिय पर्यटन स्थळांमध्ये याचा समावेश होतो. याठिकाणचे वास्तुशास्त्र अप्रतिम आहे. तसेच सुर्योदय आणि सुर्यास्ताची मजा अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणाला भेटी देतात.
5 / 9
या मंदिराची खासियत म्हणजे हिंदूंच्या सगळ्या मंदिरातील दरवाजे पुर्वेला असतात. तर या मंदिराचा दरवाजा पश्चिमेला आहे.
6 / 9
या ठिकाणाबद्दल असं म्हटलं जात की राजा सुर्यवमनला हिंदू देवी-देवतांशी जवळिक वाढवून अमर व्हायचे होते. म्हणून त्याने हे धार्मिक स्थळ उभारलं.या ठिकाणी ब्रम्हा, विष्णू, महेश यां तीन्ही देवतांची पुजा केली जाते.
7 / 9
मंदिरात प्रवेश करण्यासाठी पूल तयार करण्यात आला आहे. हा पूल ओलांडल्यानंतर एक विशाल दरवाजा प्रवेशासाठी तयार करण्यात आला आहे. या मंदिराच्या भिंतीवर संपूर्ण रामायणाच्या मुर्त्या आहेत.
8 / 9
हे मंदिर हिंदू आणि बौध्द ह्या दोन्ही धर्मांसाठी महत्वाचं आहेत. या दोन्ही धर्मांचे अनुयायी आणि उपासक या ठिकाणाला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने येतात.
9 / 9
हे मंदिर मेरू पर्वताचं सुध्दा प्रतिक आहे. या मंदिराचे चित्र कंबोडियाच्या ध्वजावरसुध्दा दिसून येते.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स