काँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 05:50 PM2018-11-21T17:50:53+5:302018-11-21T17:55:16+5:30

बँकॉकमधील Mahanakhon स्कायवॉक हा अॅडवेंचर करणाऱ्या पर्यटकांसाठी नवीन ठिकाण ठरू शकते.

Mahanakhon येथे 314 मीटर उंच हा स्कायवॉक असून याच्या रुफटॉप बारवरुन बँकॉकचे 360 डिगरी दर्शन घडते.

या स्कायवॉकवर जाण्यापूर्वी पर्यटकांना सुरक्षेसाठी फॅब्रीक बूटीज परिधान करणे आवश्यक आहे.

या स्कायवॉकवर चालताना अनेकांचा थरकाप उडतो तर काहीजण बिंधास्त मजा घेतात.

या गगनचुंबी इमारतीमध्ये 78 फ्लोर आहेत. मंगळवारी येथील ग्लास फ्लोर नागरिकांसाठी खुला करण्यात येतो.

इमारतीच्या 74 आणि 75 व्या मजल्यावर इंनडोर ऑब्जर्वेशन डेक आहे. तर 78 व्या मजल्यावर रुफटॉफ बार आहे.

विशेष म्हणजे केवळ 50 सेकंदात ग्राऊंड फ्लोर ते 74 फ्लोरपर्यंत जातात.

फेसबुक अन् इस्टाग्रामवर फोटो टाकण्यासाठी ही जागा एकदम बेस्ट आहे.

येथून बाहेर पडताना जो दरवाजा दिसतो, तो इमारतीच्या एकदम टोकाला असल्याने पर्यटकांची घबराट होते.

या इमारतीच्या बनविण्यासाठी जवळपास 1 अब्ज डॉलरचा खर्च आला आहे.

टॅग्स :पर्यटनtourism