दुबई फिरण्याची शानदार संधी! फक्त 81,000 रुपयांत हॉटेलमध्ये राहण्यासह मिळेल 'ही' सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 02:47 PM2023-02-23T14:47:05+5:302023-02-23T14:58:48+5:30

IRCTC Dubai Tour : दरवर्षी लाखो पर्यटक दुबईत भेट देण्यासाठी येतात. अशा परिस्थितीत आयआरसीटीसीने (IRCTC) एक शानदार टूर पॅकेज आणले आहे.

दुबई हे जगातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो पर्यटक दुबईत भेट देण्यासाठी येतात. अशा परिस्थितीत आयआरसीटीसीने (IRCTC) एक शानदार टूर पॅकेज आणले आहे.

Dazzling Dubai Ex Delhi असे या आयआरसीटीसीच्या टूर पॅकेजचे नाव आहे. या पॅकेजद्वारे तुम्ही दिल्ली ते दुबई प्रवास करू शकता. हे पॅकेज अतिशय किफायतशीर आहे.

या पॅकेजमध्ये दुबई व्यतिरिक्त अबुधाबीला जाण्याचीही संधी मिळणार आहे. हे एक हवाई टूर पॅकेज आहे, ज्यामध्ये तुम्ही 6 दिवस आणि 5 रात्रीच्या टूरचा आनंद घेऊ शकता.

ही टूर 23 मार्चपासून सुरू होणार असून 28 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. यामध्ये तुम्हाला दुबईतील 3-स्टार हॉटेलमध्ये राहण्याची संधी मिळेल. दुबईमध्ये तुम्हाला कॅबची सुविधा मिळेल.

याचबरोबर, या टूर पॅकेजनमध्ये नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सोय प्रत्येकाला मिळणार आहे. तसेच, आयआरसीटीसी सर्व प्रवाशांचा प्रवास विमा काढणार आहे.

जर तुम्हालाही या पॅकेजचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे पासपोर्ट असणे आवश्यक आहे. ज्याची वैधता किमान 6 महिने आहे. यासोबतच प्रवासाच्या 72 तास आधी तुमचा कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक आहे.

या टूर पॅकेजमध्ये एका व्यक्तीला प्रवास करण्यासाठी 99,000 रुपये, दोन लोकांसाठी 81,900 रुपये प्रति व्यक्ती आणि प्रवास करणाऱ्या तीन लोकांसाठी 81,900 रुपये प्रति व्यक्ती शुल्क भरावे लागेल.