फार सुंदर आहेत 'ही' पर्यटन स्थळं; पण फोटो काढण्यास मात्र मज्जाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 05:17 PM2019-08-25T17:17:43+5:302019-08-25T17:21:37+5:30

जगभरात अनेक अशी ठिकाणं आहेत जी जगभरात आपल्या वेगळेपणासाठी ओळखली जातात. आज आम्ही अशाच 5 ठिकाणांबाबत सांगणार आहोत. जिथे तुम्ही अजिबात फोटो काढू शकत नाही.

​कुमसुसन पॅलेस ऑफ द सन उत्तर कोरियातील प्योंगयांगमध्ये स्थित आहे. हे उत्तर कोरियाचे संस्थापक किम-II संग आणि त्यांचा मुलगा किम जोंग इल यांचा मकबरा आहे. हा मकबरा पाहण्यासाठी तुम्हाला आतमध्ये जाता येत नाही. फक्त अधिकारीक सरकारी टूर दरम्यानच आतमध्ये जाण्यासाठी परदेशी पर्यटकांना परवानगी देण्यात येते. ज्या लोकांना आतमध्ये जाण्यासाठी परवानगी देण्यात येते, त्यांना अनेक कठोर नियांचं पालन करावं लागतं. उदाहरणार्थ, या मकबऱ्याचे फोटो घेणं, व्हिडीओ तयार करण्यास सक्त मनाई आहे. तसेच येथे धम्रपान आणि गप्पा मारण्यासही मज्जाव आहे.

जर्मनीमध्ये असणाऱ्या या रोमॅन्टिक कॅसिलचे फोटो घेणं सोपं नाही. तुम्हाला एक गाइड सोबत फक्त 35 मिनिटांसाठी आतमध्ये जाता येतं. तसेच आतमध्ये फोटो काढण्यासाठी आणि व्हिडीओ तयार करण्यास मज्जाव आहे. तसेच तुम्ही आतमध्ये जाताना बेबी स्ट्रॉलर किंवा बॅगपॅक घेऊन जाण्यासही परवानगी दिली जात नाही.

सिस्टिन चॅपल वेटिकन सिटीमध्ये आहे. याचा वापर एक चर्च म्हणून करण्यात येतो. परंतु, हे एक संग्रहालय आहे. अनेक पर्यटक हे पाहण्यासाठी येथे येत असतात. परंतु, आतमध्ये फोटो किंवा व्हिडीओ काढण्यास सक्त मनाई आहे.

लंडनमधील दिलमध्ये असणारं शाही चर्च ​वेस्टमिंस्टर ऐबीला वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून घोषित करण्यात आलं आहे. 1090मध्ये हे चर्च उभारण्यात आलं आहे. येथे आतमध्ये फोटो किंवा व्हिडीओ काढण्यास मनाई आहे. येथील अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की, पर्टटक फोटो काढण्यात व्यस्त होतात आणि येथील सौंदर्य आणि इतिहासाचा आनंद घेऊ शकणार नाहीत. तुम्हाला फोटो पाहिजे असतील तर या चर्च्या अधिकृत वेबसाइटवरून डाऊनलोड करू शकता.

अद्याप लेनिनचा मकबरा पर्यटकांमध्ये फारसा प्रसिद्ध नाही. परंतु, जे लोक या ठिकाणी भेट देतात. त्यांना येथे फोटो काढण्यास मनाई करण्यात येते.