निसर्गरम्य ठिकाणासोबतच रहस्यमयी वॉटरफॉलसाठी ओळखलं जातं 'पोखरा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 18:15 IST2019-04-01T18:11:05+5:302019-04-01T18:15:57+5:30

ट्रॅव्हलिंगचे शौकीन असाल तर लोक जास्तीत जास्त डोंगर, वॉटरफॉल आणि सुंदर तलावांना भेट देण्यासाठी जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सुंदर शहराबाबत सांगणार आहोत. ज्याला तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. आम्ही सांगत आहोत निसर्गसौंगर्याने नटलेल्या नेपाळमधील पोखरा व्हॅलीबाबत. जिथे तुम्ही फॅमिलीसोबत एन्जॉय करण्यासोबतच तलाव आणि धबधब्यांचाही आनंद घेऊ शकता.
बेगनस झील (Begnas Lake)
नेपाळमधील तिसरी आणि पोखरामधील दुसऱ्या सर्वात मोठ्या बेगनास तलावाचं स्वच्छ आणि शांत वातावरण पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतं. एवढचं नाही तर या तलावाच्या आजूबाजूला अनेक रिसॉर्ट्सही आहेत. जिथे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत रोमॅन्टिक टाइम स्पेंड करू शकता.
डेवी वॉटरफॉल (Davi's Fall)
पोखराचा हा वॉटरफॉल फार रहस्यमयी समजला जातो. या धबधब्याचं पाणी कोणत्याही नदीमध्ये किंवा गुहेमध्ये न जाता. एका डार्क होलमध्ये जातं. ज्यामुळे हा रहस्यमयी समजला जातो. याच कारणामुळे पर्यटक आवर्जुन या ठिकाणी भेट देतात.
फेवा झील (Phewa Lake)
पोखराची सर्वात फेमस फेवा तलावामध्ये तुम्ही बोटींगचा आनंद घेऊ शकता. बोटिंग करण्यासोबतच सुंदर डोंगर पाहता येतात. खास गोष्ट म्हणजे, या तलावाचं पाणी काचेप्रमाणे स्वच्छ आहे.
सारंगकोट (Sarangkot)
नदिच्या किनाऱ्यावर असलेल्या डोंगरावरून तुम्ही गावाच्या अद्भुत प्रकृतीचा आनंद घेऊ शकतात. याव्यतिरिक्त वाइल्डलाइफही अत्यंत प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला निसर्गाची वेगवेगळी रूपं अनुभवता येतील.
पोखरा शांति स्तूप (Pokhara Shanti Stupa)
'पोखरा शांति स्तूप' पेहवावर असणाऱ्या एका छोट्याशा टेकडीवर चमकणारा पांढरं विश्वातील शांती शिवालय आहे. या स्तूपापर्यंत पोहोचण्यासाठी तीन वेगवेगळ्या रस्त्यांनी जावं लागतं. जंगल सफारी आणि लांबपर्यंत पायी चालत जावं लागतं. लोक येथे बोटीने फिरणं पसंत करतात. कारण नदीमार्गे पोखराची सुंदर दृश्य पाहायला मिळतात.