हिमालयाच्या कुशीत राहणारा लाजाळू हिमबिबट्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 15:28 IST2017-09-16T15:25:57+5:302017-09-16T15:28:39+5:30

हिमालयाच्या कुशीत राहणारा हिमबिबट्या मुळातच लाजाळू प्राणी आहे. पर्वताच्या रांगांमध्ये आणि तेही बर्फात तब्बल ५ हजार मीटर उंचीवर तो राहतो.

जिथे सतत बर्फ पडतो, अशा पर्वताच्या रांगांमध्ये हिमबिबट्या राहतो. पांढऱ्याशुभ्र बर्फात किंवा खडकांच्या रंगात मिसळून जावा असा या बिबट्याचा रंग असतो.

हिमबिबट्या समुद्रसपाटीपासून ३३५० ते ६७०० मीटर उंचीवर दिसतो. ७५ ते १३० सेंटीमीटर लांबी असलेल्या या बिबट्याची मादी यापेक्षा थोडीशी लहान असते.

मोठमोठाले दगड आणि त्याच वेळी ८५ सेंटीमीटर बर्फातही तो अगदी सहजपणे राहू शकतो. जगभरात या हिमबिबट्याची संख्या ४५१० ते ७३५० इतकी सांगितले जाते.