कधीही न पाहिलेली जगातील सगळ्यात मोठी गुहा पाहून डोळे उघडेच राहतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 07:13 PM2020-02-16T19:13:53+5:302020-02-16T19:45:35+5:30

भारतापासून ३ हजार किलोमीटर अंतरावर जगातील सगळ्यात मोठी गुहा आहे. ही गुहा व्हियेतनाम येथे आहे. हँग सन डूंग हे नाव या गुहेला देण्यात आले आहे. असं म्हटलं जातं की सगळ्यात जुनी गुहा आहे.

ही गुहा लाओल आणि व्हियेतनामच्या बॉर्डरवर स्थित आहे. ही गुहा इतकी मोठी आहे की या गुहेच्या आत एक जंगल सुद्धा तयार झालं आहे.

सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की या गुहेचा शोध अपघाताने लागला होता. १९९१ पर्यंत या गुहेबद्दल कोणालाही माहीती नव्हती.

पावसाळ्यात या गुहेतून भयंकर आवाज येऊ लागतात. २००९ पर्यंत या परिसरातील स्थानिक लोकांना या गुहेबद्दल माहिती नव्हती. त्यानंतर परदेशी पर्यटकांना या गुहेबद्दल माहिती मिळाली मग या ठिकाणी अनेक लोक पोहोचू लागले.

२००९ मध्ये ब्रिटिश केव रिसर्च असोसिएशनद्वारे एक अभियान राबवून या गूहेचा शोध घेतला. त्यानंतर इतर लोकांपर्यंत माहिती पोहोचली.

२००९ मध्ये चालू असलेले या गुहेचे संशोधन एका मोठ्या भिंतीमुळे मध्येच थांबवण्यात आले. नंतर परत २०१० मध्ये या गुहेतून बाहेर निघण्याचा रस्ता शोधण्यात आला. त्यानंतर हे गुहा एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखली जाऊ लागली.

जर तुम्हाला या जगातील सगळ्यात मोठ्या गुहेला भेट द्यायची असेल तर ४ महिने आधीपासून बुकिंग करावं लागतं.