Travel : पुतिन यांच्या रशियात फिरायला जायचा विचार करताय? किती खर्च येईल आणि कुठे कुठे फिराल? जाणून घ्या..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 17:44 IST2025-12-04T17:37:33+5:302025-12-04T17:44:32+5:30

जगातला सर्वात मोठा देश असलेल्या रशियामध्ये अॅडव्हेंचर, इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्याचा खजिना दडलेला आहे.

जगातला सर्वात मोठा देश असलेल्या रशियामध्ये अॅडव्हेंचर, इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्याचा खजिना दडलेला आहे. मॉस्कोमधील आलिशान इमारतींपासून ते सायबेरियाच्या बर्फाच्छादित पर्वतांपर्यंत, प्रत्येक पावलावर इथे एक नवा अनुभव आहे. हा देश आपल्या विशालता, ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभर ओळखला जातो. जर तुम्ही रशिया ट्रिपचे नियोजन करत असाल, तर हा प्रचंड मोठा देश फिरणे वाटते तितके सोपे नाही.

रशियामध्ये दिवसा उष्णता, तर रात्री कडाक्याची थंडी असते. त्यामुळे ट्रिप प्लान करताना सिझननुसार तयारी करणे आवश्यक आहे. रशियाचे हवामान अत्यंत वैविध्यपूर्ण असल्याने योग्य सिझन निवडणे महत्त्वाचे आहे. डिसेंबर ते मे हा काळ ऑफ-सिझन असतो. कडक थंडी आणि बर्फवृष्टीचा अनुभव घेत तुम्ही कमी दरात प्रवास करू शकता. हॉलिडे सिझनमध्ये स्कीइंग आणि इतर हिवाळी ॲक्टिव्हिटीजचा आनंद घेता येतो.

जून ते ऑगस्ट हा उन्हाळ्यातील हा काळ 'पीक सिझन' मानला जातो. या काळात दिवस खूप मोठे असतात आणि सगळीकडे प्रकाश भरपूर असतो. फोटोग्राफी, बीच ॲक्टिव्हिटीज आणि बाहेरच्या ॲडव्हेंचर्ससाठी हा सर्वोत्तम काळ आहे. तर, सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात हलकी थंडी असते, गर्दी कमी असते आणि हॉटेलचे चांगले दर मिळतात. सांस्कृतिक ठिकाणे आणि शहरांचा अनुभव शांतपणे घेण्यासाठी हा काळ चांगला आहे.

ज्या पर्यटकांना रशियाला जायचे आहे, त्यांनी लक्षात ठेवावे की इथे दिवसा तापमान जास्त असू शकते, पण रात्री थंडी जाणवते. येथील महलांचे सौंदर्य, किल्ले आणि म्युझियम्स तुम्हाला इतिहासाची सफर घडवतात. म्युझियम, पॅलेस, ओपेरा आणि बॅले यांसारख्या स्थानिक कला-संस्कृतीचा अनुभव तुमची ट्रिप शानदार बनवतो. लोकल फूड्स आणि खास 'टाटर-क्यूझीन'ट्रिपला अधिक मजेदार बनवते.

रशियाची राजधानी असलेले मॉस्को ऐतिहासिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. इथे तुम्ही क्रेमलिन, रेड स्क्वेअर आणि सेंट बेसिल कॅथेड्रल पाहू शकता. कला आणि संस्कृतीसाठी बोल्शॉय थिएटर आणि ट्रेत्याकॉव गॅलरीला नक्की भेट द्या. सेंट पीटर्सबर्ग या शहराला रशियाची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. हर्मिटेज म्युझियम, पीटर आणि पॉल फोर्ट्रेस, चर्च ऑफ द सेवियर ऑन स्पिल्ड ब्लड ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत.

टाटरस्तानची राजधानी असलेले काझान हे शहर रशियन आणि टाटर संस्कृतीचे अनोखे मिश्रण आहे. इथे काझान क्रेमलिन, कुल शरीफ मशीद आणि एनन्सिएशन कॅथेड्रल पाहण्यासारखे आहे. सोची आर्बोरेटम आणि अगुरा धबधबे येथे अवश्य भेट द्या. येथे स्कीइंग, स्नोबोर्डिंग आणि हायकिंगसारख्या ॲडव्हेंचर्सचा आनंद घेता येतो.

इर्कुत्स्क याला सायबेरियाचे प्रवेशद्वार म्हणतात. हे लेक बैकल सरोवराजवळ आहे. लेक बैकलची प्राचीन आणि खोल पाण्याची सुंदरता निसर्गाच्या अगदी जवळ घेऊन जाते. रशियाच्या दूर पूर्व भागात असलेली ही पोर्ट सिटी, व्लादिवोस्तोक फोर्ट्रेस आणि गोल्डन हॉर्न बे साठी प्रसिद्ध आहे. ट्रान्स-सायबेरियन रेल्वेचा शेवटचा थांबाही इथेच आहे.

बाल्टिक समुद्रातील ही शानदार जागा कालिनिनग्राद कॅथेड्रल आणि एम्बर म्युझियमसाठी पर्यटकांना आकर्षित करते. याव्यतिरिक्त, सायबेरियातील गावे, नेचर रिझर्व्ह्स आणि उत्तरी रशियातील 'आईस हॉटेल्स' देखील तुमची ट्रिप अविस्मरणीय बनवतील.

रशियात रुबेल हे चलन वापरले जाते. रशियाचा १ रुबेल हा भारताच्या १.१७ रुपये इतका आहे. ५ ते ७ दिवसांच्या रशिया ट्रीपसाठी तुम्हाला ६०००० ते १७५००० रुपये इतका खर्च येऊ शकतो.