शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काय सांगता! भारतातल्या 'या' ठिकाणी मुलींना जिन्स घालण्यापासून रोखलं जातं?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 5:39 PM

1 / 9
महिलांच्या पेहरावाबाबत भारतात पुर्वीपासूनच अनेक वादविवाद होते. पण सध्याच्या काळत मुली वेस्टन कल्चरनुसार आपलं ड्रेसिंग करत असतात. फार क्वचीत मुली अशा आहेत. ज्या दररोज भारतीय संस्कृतीप्रमाणे पेहराव करतात. आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणी मुलींना जीन्स घालण्यापासून अडवलं जातं. त्याठिकाणी मुलींना जीन्स घालण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.
2 / 9
हरीयाणाच्या महिला व बाल विभागात एक वेगळाच प्रकार बघायला मिळतो, येथील फिल्डवर काम करणाऱ्या महिलांना सभ्य कपडे घालण्याची ताकीद देण्यात आली आहे.
3 / 9
श्रीनगरमध्ये तर फक्त स्थानिकच नव्हे तर महिला पर्यटकांना देखील ‘योग्य परिधान आचारण’ अंतर्गत राहावे लागते. जमात-ए-इस्लामी काश्मिर या स्थानिक धार्मिक संघटनेने असे सुचवले आहे की, जम्मू-काश्मीरला येणाऱ्या स्त्रियांना अशी वस्त्रे घालणे म्हणजे स्थानिक संवेदनांबाबत असंवेदनशील असणे आहे.
4 / 9
हे हरीयाणाचे आदर्श मुलींचे महाविद्यालय असून लहान ड्रेस घातल्याने विद्यार्थिनी पूर्णपणे झाकल्या जात नाही त्यामुळे त्यांना छेडखाणीला सामोरे जावे लागते.” असं तिथल्या शिक्षकांचे मत आहे. त्यामुळे ह्या कॉलेजमध्ये पाश्चिमात्य कपडे घालण्यास मनाई आहे. आणि जर कुणी हा नियम मोडला तर त्याला १०० रुपयांचा दंड भरावा लागतो.
5 / 9
चेन्नईतील साईराम कॉलेज या इंजिनीअरिंग कॉलेजात देखील मुलींनी काय घालावे आणि काय घालू नये ह्यासंबधीचे नियम बनविण्यात आले आहेत.
6 / 9
थिरुवल्लुवर येथील आरडीएम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ह्या कॉलेजात तर गेस्ट लेक्चर घेणाऱ्या लेक्चरला देखील कपड्यांबाबतचे हे नियम पाळावे लागतात.
7 / 9
राजस्थान येथील बारमेर येथे तर फक्त जीन्स घालणेच नाही तर मुलींचे मोबाईल फोन्स वापरणे देखील बॅन आहे
8 / 9
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनग्रास आणि हारनपुस जिल्ह्यातील पश्चिम बंगालमधील किमान १० गावांत पाश्चिमात्य कपडे घालण्यास बंदी घालण्यात आली आहे.
9 / 9
तामिळनाडूतील हे मंदीर धार्मिक सभ्यतेच्या अंतर्गत येत असल्याने ह्यावर आपण कोणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही. तर मद्रास उच्च न्यायालयाने येथील मंदिरात जीन्स, तसेच छोटे कपडे घालून जाण्यास मनाई केली आहे. येथील अरुल्मिगु रामनथ स्वामी मंदिरात अनेक पर्यटक भेट देतात तेव्हा जर कुठलाही पर्यटक हा धोती, पायजामा किंवा फॉर्मल शर्ट-पँटमध्ये नसेल तसेच जर स्त्री ही साडीत नसेल तर त्यांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेTravel Tipsट्रॅव्हल टिप्स