'या' ठिकाणांवरील सूर्यास्त पाहाल, तर आयुष्यभर लक्षात ठेवाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 01:26 PM2019-08-16T13:26:00+5:302019-08-16T13:31:09+5:30

सकाळ आणि संध्याकाळ दिवसातील असे दोन प्रहर असतात, जे पाहणं खरच फार सुंदर असतं. आपल्यापैकी अनेक जणांना हे क्षण निसर्गाच्या सानिध्यात, अत्यंत शांततेत व्यतित करायचे असतात. जाणून घेऊया देशातील अशा काही निवडक ठिकाणांबाबत, जेथील संध्याकाळ अत्यंत सुंदर असते. येथील सनसेट सीन्स पाहण्याची बात काही औरच...

वाराणसीमध्ये अनेक लोक अध्यात्मिक उपचाराच्या शोधात येत असतात. येथील प्रमुख आकर्षण म्हणजे, येथील गंगा घाट. गंगेच्या किनाऱ्यावर बसून उगवणाऱ्या सूर्याचं दर्शन घेण्याचा अनुभव तुम्हाला प्रसन्न करेल. तुम्ही सकाळी लवकर उठू शकलात तर बोटीची सफरही करू शकता. पण तुम्ही येथे संध्याकाळी मावळणाऱ्या सूर्यनारायणाचं दर्शन घेऊ शकता. तसं पाहायला गेलं तर वाराणसीला महाकाल नगरी असंही म्हटलं जातं. येथे विश्व प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिर स्थित आहे.

अंदमानातील हॅवलॉक बेटावरील संध्याकाळ पाहण्याएवढं भाग्य दुसरं काहीच नाही. येथील मावळणाऱ्या सुर्याची किरणं निळ्याशार आकाशामध्ये पसरल्यानंतर दिसणारं दृश्य अत्यंत सुंदर असतं. संपूर्ण आशिया खंडामध्ये सर्वात बेस्ट सनसेट पॉइंट म्हणून हे बेट ओळखलं जातं.

टायगर हिलवरील सूर्यास्त पाहण्यासाठी सर्वात उत्तम ठिकाणांपैकी एक म्हणजे पश्चिम बंगालमधील टायगर हिल. दार्जिलिंगला येणाऱ्या पर्यटकांसाठी सर्वात मोठं आकर्षण ठरतं. टायगर हिलवरून तुम्ही राजसी माउंट कंचनजंगा आणि प्रतिष्ठित माउंट एवरेस्ट येथील सुंदर दृश्यही पाहू शकता.

नंदी हिल्स दक्षिण भारतातील नंदी शहराजवळ स्थित आहे. जर तुम्हाला एकांतात निसर्गसौंदर्याच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर हे ठिकाण उत्तम आहे. येथे पाहण्यासाठी प्राचीन मंदिरं आहेत. तसेच येथील सूर्यास्त आणि स्यूर्योदय पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात.

भारताच्या उत्तर पूर्वमध्ये असलेलं सरोवर सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. हे शिलॉन्गपासून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर आहे. जसं सूर्योदय होतो, तसं या सरोवराच्या पाण्यावर पडणारं पहिलं किरणं आणि त्यानंतर दिसणारं ते सोनेरी पाणी पाहणं फार सुंदर असतं. तसेच येथील सूर्यास्त पाहण्याचा अनुभव अत्यंत सुंदर असतो.

कन्याकुमारी म्हणजे, भारतातील अत्यंत सुंदर ठिकाणांपैकी एक. आपल्या नैसर्गिक सौंदर्याव्यतिरिक्त कन्याकुमारी जगभरामध्ये सनसेटसाठीही ओळखलं जातं. क्षितीजाकडे खोलवर जाणारा सूर्य पाहणं अत्यंत सुंदर असतं. असं वाटतं की, सूर्य समुद्राच्या पाण्यामध्येच जात आहे.