जुलैमध्ये फिरण्याचा बेत आहे? मग 'या' फेस्टिवल्सचा घ्या आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 03:03 PM2019-07-04T15:03:08+5:302019-07-04T15:19:11+5:30

जुलैमध्ये अनेक जण सुट्टी घेऊन फिरायला जाण्याचा बेत आखतात. या महिन्यात विविध ठिकाणी फेस्टिवल्सचं आयोजन करण्यात येते. विविध शहरांच्या संस्कृतीची उत्सवातून माहिती मिळते.

अमरनाथ यात्रा ही 1 जुलैपासून सुरू झाली असून ती 15 ऑगस्टपर्यंत असते. अमरनाथ बाबांच्या दर्शनासाठी हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने दरवर्षी या यात्रेमध्ये सहभागी होत असतात. देश-विदेशातून भाविक हजारोंच्या संख्येने अमरनाथ यात्रेसाठी येत असतात.

महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन घडवणारा पालखी फेस्टिवल लोकप्रिय आहे. 22 दिवस असलेल्या या फेस्टिवलची सुरुवात जुलैच्या पहिल्या आठवड्यात होते. लोक नृत्य, गाणी, पोशाष यामुळे या फेस्टिवलमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांचा आनंद द्विगुणित होतो.

पुरी येथे असलेले जगन्नाथ मंदिर हे भारतातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येथे भगवान जगन्नाथाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. जगन्नाथ मंदिरातून जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची रथयात्रा काढली जाते.

द्री फेस्टिवल मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यामध्ये लोक देवाकडे शेतात चांगले पीक यावे यासाठी प्रार्थना करतात. लोकगीत, पारंपरिक नृत्य यामध्ये पाहायला मिळतं. तसेच मिस्टर द्री ही स्पर्धा ठेवली जाते.

आंबा हे सर्वांच्या आवडीचे फळ आहे. बाजारात 10 ते 12 प्रकारचे आंबे पाहायला मिळतात. मात्र मँगो फेस्टिवलमध्ये 500 पेक्षा जास्त प्रकारचे आंबे पाहायला मिळतात. तसेच जॅम, चटणी यासारखे आंब्यापासून तयार करण्यात आलेल्या असंख्य पदार्थ्यांची चव चाखता येते. आंबे खाण्याची स्पर्धा ठेवली जाते.