इंजिनिअरींग आणि क्रिएटिव्हीटीचा अनोखा संगम आहेत दुबईतील हे वर्ल्ड फेमस ६ ब्रिज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 03:20 PM2019-08-09T15:20:22+5:302019-08-09T15:51:47+5:30

तसं तर दुबई हे शहर जगभरात बुर्ज खलीफा आणि मोठमोठ्या मॉल्ससाठी फेमस आहे. मात्र येथील असेही काही पूल आहेत, जे इंजिनिअरींगचे उत्कृष्ट नमूने आहेत. या पुलांमुळे केवळ येथील वाहतूक चांगली राहते असे नाही तर ते फेमस टुरिस्ट स्पॉट झाले आहेत. चला बघुया दुबईतील सहा जगप्रसिद्ध पूल.

१) Floating Bridge - ३६५ मीटर लांब हा ब्रिज Deira City Centre, Dubai Creek Golf आणि Yacht Club ला जोडतो. हा पूल २३ दिवसांमध्ये तयार करण्यात आला होता. पण या पुलाचा नकाशा आणि डिझाइन तयार करण्यासाठी १० महिन्यांचा कालावधी लागला होता. हा पूल गुरूवारी रात्री १० वाजेपासून शनिवारी सकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहतो.

२) Al Garhoud Bridge - १९७६ मध्ये दुबईमध्ये वाढती ट्रॅफिक जामची समस्या दूर करण्यासाठी हा पूल तयार करण्यात आला होता. या पुलाच्या दोन्ही बाजूने १४ लेन्स आहेत. ५२० मीटर लांब हा पूल पर्यटकांचं आकर्षण ठरत आहे.

३) Al Maktoum Bridge - १९६९ मध्ये बांधलेल्या या ४ वेळा मॉडिफाय करण्यात आलं. जेणेकरून वाहनांची क्षमता वाढवली जाऊ शकेल. ३७ मीटर लांब हा पूल Bur Dubai आणि Deira परिसराला जोडतो.

४) Sheikh Rashid Bin Saeed Crossing - हा पूल Sixth Crossing नावानेही ओळखला जातो. हा पूल Al Jaddaf आणि Bur Dubai ला जोडतो. १.६ किलोमीटर लांब हा पूल जगातल्या सर्वात मोठ्या Spanning Arch पुलांपैकी एक आहे. या पुलाच्या मधे एक आर्टिफिशिअल आयलंड तयार करण्यात आलं आहे.

५) Business Bay Crossing - १.६ किलोमीटर लांब आणि १६ मीटर उंच हा पूल Deira और Bur Dubai ला जोडतो. यात एकूण १३ लेन्स आहेत.

६) Al Ittihad Bridge - हा पूल Floating Bridge ची जागा घेईल. १२ लेन असलेल्या या पुलाची रूंदी ६१.२ मीटर आणि उंची १५ मीटर असेल.