...म्हणून 'ते' बेट कित्येक वर्ष निर्मनुष्य होतं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 02:43 PM2019-10-29T14:43:12+5:302019-10-29T14:50:00+5:30

जपानच्या नागासकीजवळ हाशिमा नावाचं बेट आहे. या बेटाचं क्षेत्रफळ 60 हजार चौरस मीटर इतकं आहे.

1950 च्या सुमारास याठिकाणी कोळसा खाणीत काम करणारे हजारो कामगार राहायचे. मात्र 1974 मध्ये कोळसा खाणी बंद झाल्या.

जपानमध्ये 1960 पासून पेट्रोलनं कोळशाची जागा घेतली. यानंतर हळूहळू जपानमधल्या कोळसा खाणी बंद होऊ लागल्या.

मित्सुबिशी कंपनीनं हाशिमा बेटावरील कोळसा खाण 1974 मध्ये बंद केली. त्यामुळे हाशिमा बेट निर्मनुष्य झालं.

2009 साली हाशिमा बेट पुन्हा खुलं करण्यात आलं. 2015 मध्ये या बेटाला युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला.

2012 मध्ये आलेल्या स्कायफॉल चित्रपटात हाशिमा बेट दाखवण्यात आलं होतं.