शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'ही' आहेत खिशाला परवडणारी देशातील 5 रोमँटिक ठिकाणं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 3:37 PM

1 / 5
हॅवलॉक आयलँड: खिशाला फारशी कात्री न लावता रोमँटिक ठिकाणाची सैर करायची असेल तर हॅवलॉक आयलँडला भेट द्यायला हवी. अंदमान बेटाचा भाग असणारं हे ठिकाण नितांत सुंदर आहे. हिरवी वनराई, निळंशार पाणी, स्वच्छ समुद्र किनारे असं निसर्ग सुख अनुभवायचं असेल, तर हॅवलॉक आयलँडला भेट द्यायलाच हवी.
2 / 5
अॅलेपी: केरळमध्ये असलेलं हे ठिकाण अतिशय सुंदर आहे. मात्र सध्या केरळमधील जनजीवन महापुरामुळे विस्कळीत झाल्यानं काही महिन्यांनी या ठिकाणी जाता येईल. बॅकवॉटर, हाऊसबोट आणि कालव्यांमुळे या परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे.
3 / 5
ऑली: उत्तराखंडमधील चमोलीमध्ये वसलेल्या या ठिकाणाला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. यामध्ये नवदाम्पत्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. स्किईंग करण्यासाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे.
4 / 5
जसलमेर: या शहराला प्रचंड मोठा इतिहास आहे. शेकडो वर्षांच्या प्रथा-परंपरा या शहरानं आजही जपल्या आहेत. थार वाळवंटातील मुक्काम, उंटांवरील प्रवास, अनेक ऐतिहासिक आणि सुंदर राजवाडे यांच्यामुळे जसलमेर शहराला दिलेली भेट अविस्मरणीय ठरते.
5 / 5
हॅफलाँग: आसाममध्ये असणारं हे हिल स्टेशन कपल्समध्ये अतिशय लोकप्रिय आहे. निसर्गसौंदर्यानं नटलेलं हे ठिकाण डोंगरांच्या कुशीत वसलेलं आहे.
टॅग्स :tourismपर्यटन