६ फुट अजगर अन् २ फुटी डुरक्या घोणस मानवी वस्तीत, स्वयंसेवकांनी केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 19:26 IST2020-05-18T18:56:16+5:302020-05-18T19:26:06+5:30

वाढत्या उष्णतेमुळे सरपटणारे वन्यजीव मानवी वस्तीत दिसून येत आहेत. तसेच लोकमान्य नगर ठाणे येथे एका चाळीत अजगर प्रजातीचा बिनविषारी साप दिसून आले.

त्या भागातील रहिवाशांमध्ये हे भीतीचे वातावरण पसरले. स्थानिक रहिवाशी सुनील हरपाल यांनीसदर घटनेची माहिती प्लॅंट अन्ड एनिमल वेल्फेअर सोसायटी-मुंबई (पॉज-मुंबई) आणि अम्मा केअर फाऊंडेशन (एसीएफ) च्या मदत क्रमांकावर माहिती दिली.

सदर माहिती मिळाल्यानुसार पॉज-मुंबई एसीएफ चे स्वयंसेवक हसमुख मारुती वळंजू घटनास्थळी दाखल झाले, साडेसहा फुटाच्या अजगराला पकडण्यात यश आले.

वागळे इस्टेट रोड ॲपलॅब कंपनी मध्ये कॅन्टीन मधून डुरक्या घोणस प्रजातीचा बिनविषारी साप पकडण्यात आला. अशी माहिती पॉज-मुंबई एसीएफचे निशा कुंजू यांनी दिली.

मानद वन्यजीव रक्षक सुनिष सुब्रमण्यन यांनी सांगितले की दोन्ही सापांची वैद्यकीय तपासणी डॉ. राहुल मेश्राम यांनी केली आणि आणि त्या दोन्ही सापांना निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.

आपल्या विभागांमध्ये कुठलेही वन्यजीव दिसल्यास पॉज-मुंबई एसीएफ हेल्पलाईन क्रमांक ९८३३४८०३८८ किंवा वन विभाग नियंत्रण कक्षाशी १९२६ ह्या क्रमांकावर संपर्क साधावा.