बदलापूरमध्ये पुन्हा महापूर! रस्ते, उद्याने, दुकाने बुडाली, सोसायट्यांमध्येही घुसले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 03:54 PM2021-07-22T15:54:07+5:302021-07-22T16:06:18+5:30

Badlapur,Thane rain update: गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आज बदलापूर शहराला जोरदार तडाखा दिला आहे. मुसळधार पावसामुळे शहराजवळून वाहणाऱ्या उल्हास नदीला पूर आला असून, या पुराचे पाणी शहराच्या अनेक भागांत घुसले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आज बदलापूर शहराला जोरदार तडाखा दिला आहे. मुसळधार पावसामुळे शहराजवळून वाहणाऱ्या उल्हास नदीला पूर आला असून, या पुराचे पाणी शहराच्या अनेक भागांत घुसले आहे.

शहरातील उल्हास नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या रमेशवाडी आणि वालिवली परिसरातील गृहसंकुलाना देखील पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे.

गेल्या 48 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूर शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

बदलापूर गावाकडे जाणाऱ्या उल्हास नदीवरील पूल पूर्णपणे पाण्याखाली आला होता. त्यामुळे बदलापूर गावाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला.

नदी पात्र पासून दीड किलोमीटर पर्यंत पाणी शहरात गेल्याने अनेक गृहसंकुलातील पहिल्या माळ्यापर्यंत पाणी आले होते. या भागातील चाळी पूर्णपणे पाण्याखाली आल्या होत्या.

उल्हास नदीच्या किनाऱ्यावर असलेले गोठे आणि त्यातील गुरे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

बदलापूर मधील उल्हास नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या जुन्या इमारतींच्या तळमजला पूर्णपणे पाण्याखाली आले होते.

मुसळधार पाऊस आणि पुराच्या पाण्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांना असे नदीचे रूप आले होते.

शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली आहेत.

अनेक संकुलांमध्ये तसेच उद्यानांमध्ये पुराचे पाणी धुसले आहे.

पुराचा फटका रेल्वेलाही बसला असून, बदलापूरमधील कर्जतकडे जाणारा रेल्वेमार्ग पाण्याखाली गेला होता. तसेच काही ठिकाणी सिग्नल तसेच वीजपुरवठा करणारे पोल कोसळले आहेत

पुरामुळे रेल्वेच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याने वाहतूक पूर्वपदावर आणताना रेल्वेची कसोटी लागणार आहे

Read in English