मीरा-भाईंदर पालिकेत आयुक्तांनी घेतली नगरसेवकांची कार्यशाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 17:59 IST2017-12-15T17:51:11+5:302017-12-15T17:59:51+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेने यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षण 2018मध्ये अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी स्वच्छता अभियान मोहिमेला जोरदार सुरुवात केली आहे.
त्यात थेट आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी नगरसेवकांच्या कार्यशाळेचे आयोजन शुक्रवारी पालिका मुख्यालयात केले होते.
पालिकेने प्रामुख्याने आयुक्तांनी यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षणात गतवेळपेक्षा वरचा क्रमांक मिळवण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे.
त्यासाठी स्वच्छतेचे मोबाइल अॅपदेखील सुरू केले आहे. त्या अॅपवर नागरिकांनी स्वच्छतेप्रती समाधान व्यक्त करायचे आहे.
स्वच्छतेचा मोबाईल अॅप डाऊनलोड करण्यासाठी सर्वांना दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर्मचारी व अधिकारी धावपळ करीत आहेत.