शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लय भारी! Whatsapp आता Colourful होणार; चॅटिंगची गंमत आणखी वाढणार, नवं फीचर कमाल करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 5:44 PM

1 / 16
इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप हे एक लोकप्रिय अ‍ॅप आहे. मोठ्या प्रमाणात याचा वापर हा केला जातो. युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हाव म्हणून व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. 
2 / 16
व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. कारण आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅप आता आणखी कलरफूल होणार आहे. युजर्सना अ‍ॅपमधील रंग बदलता येणार असल्याची माहिती मिळत आहे. 
3 / 16
WaBetaInfo या वेबसाईटने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करून दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅप एका अशा फीचरवर काम करीत आहे जे युजर्सना अ‍ॅपमधील काही रंग बदलण्याची मुभा देईल. या फीचरवर सध्या काम चालू असून अधिकची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 
4 / 16
नव्या फीचरचे काही स्क्रीनशॉट देखील ट्विटरवरून शेअर करण्यात आले आहेत. या फीचरचा वापर करून युजर्स चॅटबॉक्समधील काही रंग बदलू शकतील. युजर्सना स्क्रीनवरील मजकूरासाठी डार्क ग्रीन किंवा लाईट ग्रीन कलरची पण निवड करता येईल.
5 / 16
व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या फीचरमध्ये ग्रीन कलरच्या अनेक शेड्स मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. या फीचरमुळे युजर्सना चॅट करताना देखील मजा येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
6 / 16
व्हॉट्सअ‍ॅपवर अनेकदा मेसेज टाईप करायला पुरेसा वेळ नसतो अथवा कंटाळा येतो. मात्र आता अशा युजर्ससाठी एक खूशखबर आहे. कारण आता टाईप न करता देखील खास मेसेज पाठवता येणार आहे.
7 / 16
व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. यावेळी देखील असंच एक भन्नाट फीचर आणलं आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स मेसेज टाईप न करता बिनधास्त पाठवू शकणार आहेत.
8 / 16
व्हॉट्सअ‍ॅपसोबत इतरही अ‍ॅप्समध्ये याचा वापर करता येणार आहे. यामध्ये मोठे मोठे मेसेज टाईप करत बसण्याची गरज नाही. तर फक्त बोलून हे काम सहज होणार आहे. या फीचरमध्ये युजरच्या आवाजानुसार मेसेज टाईप होणार आहे.
9 / 16
जो काही संदेश पाठवायचा आहे तो बोलल्यावर आपोआप टाईप होईल, त्यानंतर सेंड बटण डाबून तो समोरच्या व्यक्तीला पाठवता येणार आहे. यासाठी गुगल इंडिक की बोर्ड डाऊनलोड करू शकता. यात हिंदीसह अनेक भाषेला सपोर्ट केला आहे.
10 / 16
टाईप न करता मेसेज पाठवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप ओपन करावं लागेल. त्यानंतर चॅट वर जा. ज्या व्यक्तीला मेसेज पाठवायचा आहे. त्याचं चॅट ओपन करा.
11 / 16
मेसेज पाठवण्यासाठी कीबोर्ड ओपन करावा लागेल. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये व्हाईस मेसेज पाठवण्यासाठी माईकचे सिम्बॉल दिले आहे. त्यावर क्लिक करायचं नाही. तुम्हाला फक्त कीबोर्ड ओपन करून त्या माईकवर टॅप करायचं आहे.
12 / 16
माईक ओपन होईल त्यानंतर तुम्हाला बोलायचे आहे. तुम्ही जे बोलाल ते स्क्रीनवर आपोआप टाईप होईल. पूर्ण मेसेज टाईप झाल्यानंतर माईक आयकॉनवर टॅप करायचं आहे. त्यानंतर फक्त सेंडचं बटण दाबायचं आहे.
13 / 16
व्हॉट्सअ‍ॅपने युजर्ससाठी WhatsApp Mute Video फीचरला अखेर कंपनीने लाँच केलं आहे. याआधी व्हॉट्सअ‍ॅपचं हे फीचर टेस्टिंगसाठी बीटा युजर्संसाठी उपलब्ध होते.
14 / 16
व्हॉट्सअ‍ॅपचे लेटेस्ट फीचर्सला ट्रॅक करणाऱ्या ब्लॉग WABetaInfo ने गेल्या महिन्यात या फीचरची माहिती दिली होती. आता फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप कंपनीने ट्विटरवर याची घोषणा केली आहे.
15 / 16
हे फीचर युजर्सला कोणत्याही व्हिडीओला आपल्या कॉन्टॅक्टसोबत शेअर करण्याआधी म्यूट करू शकतील. नवीन म्यूट व्हिडीओ फीचरमध्ये व्हिडीओ एडिटिंग स्क्रीनवर पाहिले जाऊ शकतो.
16 / 16
व्हिडीओ एडिट स्क्रीनवर सर्वात वरच्या कोपऱ्यात एक व्हॅल्यूम आयकॉन दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर शेअर केले जाणार आहे. त्यानंतर व्हिडीओ म्यूट होणार आहे. याचा युजर्सना मोठा फायदा होणार आहे.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन