Xiaomi Flagship Days Sale: पॉवरफुल शाओमी स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट; 9,000 रुपयांपर्यंतची होऊ शकते बचत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 07:19 PM2021-12-08T19:19:13+5:302021-12-08T19:34:16+5:30

Xiaomi Flagship Days Sale: शाओमीनं Xiaomi Flagship Days Sale ची सुरुवात केली आहे. हा सेल 7 ते 11 डिसेंबर 2021 दरम्यान Amazon India वर सुरु राहील. या सेल अंतर्गत शाओमीच्या दमदार फ्लॅगशिप फोन्सवर 9 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जाईल. यात ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर 4000 रुपयांची इन्स्टंट डिस्काउंट असेल. तर 5000 रुपयांची सूट जुना फोन एक्सचेंज करून मिळवता येईल.

या सेल अंतर्गत 22,999 रुपयांमध्ये मिळणारा Xiaomi 11 Lite NE 5G फोन वर 4000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच 5000 रुपयांची एक्सचेंज ऑफर वापरून अजून बचत करता येईल. या स्मार्टफोनमध्ये 6.55 इंचाचा FHD अ‍ॅमोलेड डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह देण्यात आला आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर मिळतो. बॅक पॅनलवर 64MP+ 8MP+ 2MP असा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. तर फ्रंटला 20MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमधील 4,250mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Mi 11X 5G ची किंमत देखील 22,999 रुपये आहे. परंतु सेलमध्ये या फोनवर देखील 4000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट आणि 5000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. हा डिवाइस 6.67-इंचाच्या FHD+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात आला आहे. जो 1300 nits ब्राईटनेस आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 SoC चिपसेट आणि 48 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

31,999 रुपयांमध्ये येणाऱ्या Mi 11X Pro 5G वर 2,500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच जुना फोन एक्सचेंज करून 5000 रुपये वाचवता येतील. हा शाओमी फोन 6.67-इंचाच्या FHD+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 108MP + 8MP + 5MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो.

Mi 10 ची किंमत 49,999 रुपयांपासून सुरु होते. हा फोन 6.67 इंचाच्या फुल एचडी+ 3डी कर्व्ड डिस्प्लेसह बाजारात आला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा फोन Qualcomm Snapdragon 865 चिपसेटवर चालतो. यात 108MP + 13MP + 2MP + 2MP असा क्वॉड कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 20MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,780mAh ची बॅटरी देण्यात आली आहे

Mi 10T देखील गेल्यावर्षीच फ्लॅगशिप फोन आहे, जो 31,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Mi 10T स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 144Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. डिवाइसला Qualcomm Snapdragon 865 प्रोसेसरची ताकद मिळते. यात 64MP + 13MP + 5MP असा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. तर फ्रंटला 20MP चा सेन्सर आहे.

Xiaomi Flagship Days Sale मध्ये मिळणार डिस्काउंट फक्त 11 डिसेंबर 2021 पर्यंत मिळेल. त्यामुळे Amazon India वर सुरु असलेल्या या सेलचे शेवटचे 3 दिवस उरले आहेत.