अलर्ट! QR कोड स्कॅन करताना सावधान; एक चूक अन् आयुष्यभर पश्चाताप, 'असं' राहा सेफ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 02:11 PM2024-01-16T14:11:35+5:302024-01-16T14:25:20+5:30

QR Codes : लोकांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी हॅकर्स नवनवीन पद्धती शोधून काढत आहेत.

QR कोड स्कॅन करून युजर्स अगदी सहज पेमेंट करू शकतात. पण तुम्हाला QR कोड स्कॅमबद्दल माहिती आहे का? Polo Alto Networks ने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की भारतात QR कोड स्कॅम वाढत आहेत.

लोकांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी हॅकर्स नवनवीन पद्धती शोधून काढत आहेत. फक्त बंगळुरूमध्ये, 2017 ते 13 मे 2023 पर्यंत, 41 टक्के प्रकरणे QR कोड, Malicious links किंवा डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड फसवणुकीशी संबंधित आहेत.

रिपोर्टमध्ये पुढे म्हटलं आहे की खऱ्या आणि खोट्या QR कोडमध्ये फरक करणे खूप कठीण आहे. दोन्ही QR दिसायला सारखे असतात. याचा फायदा घेऊन, स्कॅमर त्यांचा कोड मूळ QR कोडने बदलतात. त्यामुळे अशा वेळी पेमेंट करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

क्यूआर कोड स्कॅम हा सायबर फसवणुकीचाच एक प्रकार आहे. जेव्हा जेव्हा युजर्स सायबर फ्रॉड करणाऱ्यांचा कोड स्कॅन करतात तेव्हा तो कोड त्यांना फिशिंग वेबसाइटवर घेऊन जातो किंवा त्यांच्या डिव्हाइसवर मालवेअर इन्स्टॉल करतो.

क्यूआर कोड स्कॅममध्ये डिव्हाइसमधून पैसे देखील ट्रान्सफर केले जाऊ शकतात. अनेक प्रकरणांमध्ये ही रक्कम लाखो रुपयांपर्यंत पोहोचते. स्कॅमरना फोनवर रिमोट ऍक्सेस देखील मिळतो.

क्यूआर कोड स्कॅमपासून तुमचं रक्षण व्हाव यासाठी तुम्ही काही खास टिप्स फॉलो करू शकता. कोणताही अज्ञात कोड स्कॅन करण्यापूर्वी, तो नेमका कोणाचा कोड आहे याची एकदा खात्री करा.

पेमेंट करण्यापूर्वी, तुमच्या मोबाइलमध्ये असलेल्या QR कोड स्कॅनरने कोणताही QR कोड स्कॅन करा. यासह, युजर्स सहजपणे डेस्टिनेशन URL तपासू शकतात.

मोबाईलमध्ये कोणतेही एप इन्स्टॉल करण्यासाठी नेहमी अधिकृत स्टोअरचीच मदत घ्या. क्यूआर कोड स्कॅन करून कोणतेही एप इन्स्टॉल करणे टाळावं. योग्य ती खबरदारी घ्या.