Twitter वर ब्लू टिकसाठी युजर्स लवकरच करू शकणार अ‍ॅप्लिकेशन, अशी असेल क्रायटेरिया...

Published: May 17, 2021 04:55 PM2021-05-17T16:55:39+5:302021-05-17T18:15:47+5:30

Twitter : ट्विटर युजर्संना सामान्यत: वाटते की, त्यांचे अकाऊंट व्हेरिफाय व्हावे आणि त्यांना निळा टिक मिळावा.

मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवर मोठ्या प्रमाणात दोन प्रकारच्या प्रोफाइल असतात. एक ज्यात निळा (ब्लू) टिक आहे, म्हणजेच व्हेरिफाइड अकाऊंट आणि दुसरे नॉन व्हेरिफाइड अकाऊंट.

ट्विटर युजर्संना सामान्यत: वाटते की, त्यांचे अकाऊंट व्हेरिफाय व्हावे आणि त्यांना निळा टिक मिळावा. याआधी ट्विटर व्हेरिफिकेशनसाठी अर्ज केले जात होते, परंतु आता ते बंद करण्यात आले.

सध्या ट्विटर व्हेरिफिकेशन कंपनी स्वत: करते आणि यासाठी अर्ज करता येऊ शकत नाही. कंपनीने 2018 मध्ये व्हेरिफिकेशनसाठी पब्लिक अॅप्लिकेशन ( सार्वजनिक अर्ज ) बंद केले होते. मात्र, आता हे पुन्हा एकदा सुरू होणार आहे. कंपनीने गेल्या वर्षी असे सांगितले होते की, पब्लिक व्हेरिफिकेशन 2021 पासून येईल. मात्र, कंपनीने अद्याप याची घोषणा केलेली नाही.

दरम्यान, वेब डेव्हलपर Jane Manchun Wong यांनी एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये ट्विटरच्या नवीन व्हेरिफिकेशन रिक्वेस्ट फॉर्मवर काम सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये ट्विटर व्हेरिफिकेशनसाठी काय निकष (क्रायटेरिया) असेल आणि युजर्संनी काय सबमिट करावे, हे दिसून येत आहे.

व्हेरिफिकेशनपूर्वी पात्र (एलिजिबल) असणे आवश्यक आहे. येथे विविध कॅटगरीज आहेत - जसे की कंपनी, कार्यकर्ता, सरकारी अधिकारी, पत्रकार आणि इन्फ्लूएंसर. अॅप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी सरकारने जारी केलेले आयकार्ड द्यावे लागेल.

या व्यतिरिक्त आपले अकाऊंट का व्हेरिफाय केले जावे? हे देखील आपल्याला सांगावे लागेल. आपल्याला काही लिंक्स द्याव्या लागतील. जिथे आपला उल्लेख, बातमी कव्हरेज आहे किंवा विकिपीडिया पेज आहे.

व्हेरिफिकेशनसाठी योग्यतेबद्दल सांगायचे झाल्यास, येथे केवळ कार्यकर्ता, कंपनी, एन्टरटेनमेंट ग्रुप, सरकारी अधिकारी, पत्रकार आणि प्रोफेशनल स्पोर्ट्स एंटिटीला व्हेरिफाय केले जाईल.

यासाठी सरकारी आयडी अपलोड करावी लागेल. ट्विटरला तुम्ही आपल्याबद्दलच्या बातम्या कव्हरेजच्या लिंक, गुगल ट्रेंड्स, विकिपीडिया आर्टिकल किंवा ऑफिशियल लीडर्शिप वेबसाइटची लिंक द्याल.

संपूर्ण प्रक्रियेनंतर, तुम्ही फॉर्म भरुन ऑनलाईन सबमिट कराल आणि त्यानंतर आपल्याला ट्विटरच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करावी लागेल. जर ट्विटरला असे वाटत असेल की, आपले प्रोफाइल व्हेरिफायड केले जावे, तर आपल्याला निळा टिक मिळेल अन्यथा आपला अर्ज नाकारला जाईल आणि काही काळानंतर आपल्याला पुन्हा अर्ज करण्यास सांगितले जाईल.

सध्या कंपनीने याबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितले नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच असे म्हटले गेले होते की, 2021 च्या सुरूवातीला ट्विटर पब्लिक व्हेरिफिकेशन सुरू केले जाईल.