नववर्षात फोन खरेदीचा विचार करताय?; हे आहेत बजेटमध्ये बसणारे बेस्ट पर्याय

By मोरेश्वर येरम | Published: January 2, 2021 07:09 PM2021-01-02T19:09:33+5:302021-01-02T19:21:03+5:30

नव्या वर्षात नवा स्मार्टफोन घ्यायचा विचार करताय? आणि तुम्ही बजेटेड फोनच्या शोधात आहात मग हे आहेत तुमच्या समोरील पर्याय...

२०२० या वर्षात कोरोनाच्या प्रकोपानंतरही अनेक स्मार्टफोन्स लॉन्च झाले. गेल्या वर्षात फोल्डेबल फोन्सपासून 5G फोन्सपर्यंत लेटेस्ट स्मार्टफोन्स बाजारात आले. आता नववर्षात आपण प्रवेश केला आहे आणि तुम्ही नववर्षात स्मार्टफोन घ्यायचा विचार करत आहात? तर आपण काही बेस्ट बजेडेट स्मार्टफोन्सवर एक नजर टाकू...

'वन प्लस ८टी ५ जी' हा स्मार्टफोन ४२,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. 5G इंटरनेट स्पीडसाठी सज्ज असलेला हा फोन नक्कीच उत्तम पर्याय ठरू शकतो. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर, 120Hz AMOLED डिस्प्ले, 48MP क्वॉड कॅमेरा सेटअप आणि 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे.

आयफोन खरेदी करण्याची इच्छा आणि तोही तुमच्या बजेटमध्ये बसेल असा हवाय का? तर iPhone SE 2020 हा उत्तम पर्याय आहे. जबरदस्त परफॉरमन्स आणि उत्तम कॅमेरा असलेला हा फोनची सध्या चलती आहे. फ्लिपकार्टवर iPhone SE 2020 ची किंमत सध्या ३५,९९९ रुपये इतकी आहे. A13 Bionic प्रोसेसर आणि 12MP रिअर कॅमेरा असलेला हा फोन बेस्ट बजेडेट आयफोन ठरतो.

जर तुम्ही २५ हजार रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर OnePlus Nord हा उत्तम पर्याय आहे. 5G इंटरनेट स्पीड सपोर्ट, स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर, 90Hz AMOLED डिस्प्ले, 30W फास्ट चार्जिंग, 48MP क्वॉड रिअर कॅमेरा आणि इन-डिस्ल्पे फिंगरप्रिंट सेंसर असे अद्ययावत फिचर्स तुम्हाला यात मिळतील. या फोनची किंमत २४,९९९ रुपये इतकी आहे.

OnePlus Nord सोबतच तुमच्याकडे Realme X3 SuperZoom हा देखील उत्तम पर्याय आहे. यात 5G ची सुविधा नसली तरी जबरदस्त स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर यात मिळेल. याशिवाय 60X झूम सपोर्टवाला टेलीफोटो कॅमेरा, 120Hz डिस्ल्पे आणि 30W फास्ट चार्जिंगची सुविधा यात मिळते. या फोनची किंमत २७,९९९ रुपये इतकी आहे.

२० हजार रुपयांच्या आत तुम्ही उत्तम स्मार्टफोनच्या शोधात असाल तर Poco X3 हा मस्त पर्याय आहे. फ्लिपकार्टवर हा फोन सध्या १६,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. 120Hz डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ७३२ जी प्रोसेसर, 6000mAh क्षमतेची बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग आणि 64MP क्वाड कॅमेरा सेटअप या फोनमध्ये मिळेल.

मिड-रेंज 4G फोनमध्ये Redmi Note 9 Pro Max हा स्वस्त आणि मस्त फोन आहे. हा फोन तुम्हाला १५,९९९ रुपयांना विकत घेता येईल. यात स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर, 64MP क्वाड कॅमेरा सेटअप, 5020mAh क्षमतेची बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 32 MP सेल्फी कॅमेरा मिळेल.

गेमर्स कंपनीसाठी Realme Narzo 20 Pro हा मस्त स्मार्टफोन आहे. १४,९९९ रुपयांना हा फोन विकत घेता येईल. Helio G95 प्रोसेसर, 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट, 48MP क्वॉड कॅमेरा सेटअप आणि 90Hz डिस्प्ले या फोनमध्ये देण्यात आला आहे.

मिड रेंज सेगमेंटमध्ये Realme 6 हा एक अष्टपैलू स्मार्टफोन आहे. या फोनची किंमत १३,९९९ रुपये इतकी आहे. यात Helio G90T प्रोसेसर, 90Hz डिस्प्ले, 64MP क्वॉड कॅमेरा सेटअप आणि 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट यात देण्यात आला आहे.

Read in English