स्मार्टफोनचा रिकामा बॉक्स कचरा समजून फेकू नका; 'या' ८ फायद्यांसाठी नेहमी जपून ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 18:06 IST2025-10-23T17:56:57+5:302025-10-23T18:06:58+5:30

Smartphone Box: नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर ॲक्सेसरीज ज्या डब्ब्यात पॅक केलेल्या असतात, तो निरुपयोगी समजून फेकून देतात. मात्र, हा रिकामा बॉक्स केवळ पॅकेजिंगसाठी नसतो, तर तो अनेक महत्त्वाच्या कामांसाठी उपयुक्त ठरतो.

ॲक्सेसरीज सुरक्षित ठेवणे: चार्जर, यूएसबी केबल, ईयरफोन यांसारख्या लहान आणि वारंवार हरवणाऱ्या ॲक्सेसरीज या डब्ब्यात सुरक्षितपणे ठेवता येतात.

वॉरंटी क्लेमसाठी उपयुक्त: अनेकदा वॉरंटी क्लेम करताना किंवा फोन दुरुस्तीसाठी देताना बॉक्सवरील IMEI नंबर आणि सीरियल नंबरची माहिती आवश्यक असते. हा बॉक्स ही माहिती जपून ठेवतो.

बिल आणि कागदपत्रे सुरक्षित: फोन खरेदीचे बिल आणि मॅन्युअल (Manual) याच डिब्ब्यात ठेवल्यास ते आवश्यकतेनुसार सहज उपलब्ध होते, ज्यामुळे वारंटी किंवा इतर कायदेशीर कामे सोपी होतात.

उत्कृष्ट गिफ्ट पॅकेजिंग: जर तुम्हाला कोणाला स्मार्टफोन भेट (गिफ्ट) म्हणून द्यायचा असेल, तर मूळ बॉक्समध्ये दिलेले गिफ्ट अधिक आकर्षक आणि खास वाटते.

पर्यावरण संरक्षणामध्ये मदत: सध्या अनेक कंपन्या रिसायकलेबल (Recyclable) मटेरियलचे बॉक्स बनवतात. हे बॉक्स फेकून न देता त्यांचा पुनर्वापर केल्यास पर्यावरणाचे संरक्षण करण्यात तुमचा सहभाग असतो.

विश्वसनीयता सिद्ध होते: बॉक्स आणि संपूर्ण पॅकेजिंग व्यवस्थित जपल्यास, तुमचा फोन आणि त्याची काळजी किती चांगल्या प्रकारे घेतली गेली आहे, हे नवीन खरेदीदारांना कळते.