सॅमसंगच्या गॅलॅक्सी नोट 9 बद्दल थोडेसे...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 09:27 PM2018-08-27T21:27:07+5:302018-08-27T21:44:22+5:30

सॅमसंगने नुकताच नोट 9 हा बाजारात लाँच केला. गेल्या वर्षीच्या नोट 8 च्या तुलनेत म्हणायला गेले तर फारसेबदल केले नाहीत. पण हे बदल काहीसे वेगळेही वाटू शकतात.

नोट 9 हा 8 पेक्षा लांबी आणि रुंदीला जास्त आहे. मात्र, उंची सारखीच आहे. डिस्पेही जास्त नाही तर 0.1 इंचाने वाढविला आहे.

नोट 8 मध्ये फिंगर प्रिंट स्कॅनर कॅमेऱ्याच्या बाजुला होता. नोट 9 मध्ये तो कॅमेराच्या खाली घेण्यात आला आहे.

बॉडी मेटलची असून त्यावर ग्लास ब्लेंड केली गेली आहे. तर पाण्यापासून सुरक्षेसाठी नॅनो कोटींग देण्यात आले आहे.

सॅमसंग नोट 9 मध्ये पाठीमागे दोन 12 मेगापिक्सल कॅमेरे देण्यात आले आहेत.

या वेळची मोठी अपडेट म्हणजे....एस पेन. यामध्ये ब्लुटुथची सुविधा देण्यात आली आहे.