...तर तुमच्या मोबाईलवर २० दिवसानंतर व्हॉट्सअप चालणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 02:59 PM2019-12-11T14:59:51+5:302019-12-11T15:03:35+5:30

सोशल मीडियात सर्वाधिक चालणारं व्हॉट्सअप जानेवारी २०२० मध्ये लाखो स्मार्टफोन्समधून बंद पडणार आहे. Whatsapp कडून याची माहिती देण्यात आली आहे की, काही मोबाईलमधून ३१ डिसेंबरपासून Whatsapp सपोर्ट करणार नाही.

Window Mobile मधून ३१ डिसेंबरपासून व्हॉट्सअप बंद होणार आहे. त्याचसोबत काही आयफोन युजर्सलाही याचा फटका बसेल

जर तुमच्या आयफोनमध्ये Ios7 पासून जने सॉफ्टवेअर आहे त्यातून व्हॉट्सअप बंद पडणार आहे. मात्र याची मुदत १ फेब्रुवारी २०२० पर्यंत निश्चित केला आहे.

Android यूजर्सबाबत सांगायचं झालं तर ज्या यूजर्सकडे Android 2.3.7 यात व्हॉट्सअप सपोर्ट मिळणार नाही. Whatsapp आयफोनमध्ये सुरु ठेवायचं असेल तर IOS 9 च्या वरील अपडेट असणे गरजेचे आहे.

कंपनीने हेदेखील सांगितले आहे की, IOS 8 मध्ये तुम्ही व्हॉट्सअप सुरु करु शकत नाही. जर तरीही तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअप सुरु राहिले तर १ फेब्रुवारीपासून ते बंद होईल. व्हॉट्सअपने सांगितले आहे की, आम्ही जुन्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये डेव्हलेप करत नाही. त्यामुळे अनेक फिचर्स काम करणं बंद होऊ शकतं.

कंपनीने युजर्सला स्मार्टफोन अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. व्हॉट्सअप मोडिफिकेशन्समुळे काही डिवाइसमध्ये सपोर्ट करणार नाही