Smartphones Under 10000: फक्त १० हजारांत खरेदी करा जबरदस्त कॅमेरा असलेले स्मार्टफोन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 21:43 IST2025-05-06T21:38:17+5:302025-05-06T21:43:58+5:30
50 MP Camera Phones Under 10000: कमी किंमतीत चांगला कॅमेरा असलेला सॅमसंग कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे.

अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या उन्हाळी सेलमध्ये स्मार्टफोन कंपनी सॅमसंगचे नवीनतम फोन मोठ्या सवलतीत विकले जात आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी एम ०६ 5G: हा बजेट स्मार्टफोन आहे. अॅमेझॉनवर हा स्मार्टफोन २०० रुपयांच्या डिस्काऊंटसह ८ हजार २९९ रुपयांत उपलब्ध आहे. या फोनमध्ये ग्राहकांना ६.५ एचडी प्लस डिस्प्ले मिळतो. याशिवाय, या फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो. फोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमतेची बॅटरी मिळते.
सॅमसंग गॅलेक्सी एफ ०६ 5G: या फोनमध्ये ग्राहकांना ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो. हा फोन तुम्ही फ्लिपकार्ट ८ हजार ४९९ रुपये मध्ये खरेदी करू शकतात. या फोनमध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली.
सॅमसंग गॅलेक्सी ए ०६ 5G: स्टायलिश आणि बेसिक 5G कनेक्टिव्हिटी असलेला फोन खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी हा चांगला पर्याय आहे. हा फोन फ्लिपकार्टवरून ९ हजार ७१० रुपये मध्ये खरेदी करू शकतात. या फोमध्ये ग्राहकांना ५० मेगापिक्सेलचा कॅमरा आहे. या फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी मिळते.
सॅमसंग गॅलेक्सी एम १६ 5G: या फोनमध्ये ६.६ इंच फुल एचडी डिस्प्ले मिळत आहे. हा फोन १० हजार २४८ रुपयांत खरेदी करू शकतात. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला.