शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

... म्हणून वाढवली Smartphones ची किंमत; Xiaomi नं दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 5:15 PM

1 / 6
शाओमीनं (Xiaomi) गेल्या काही आठवड्यांदरम्यान, आपल्या सर्व लोकप्रिय स्मार्टफोन्सची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये Redmi Note 10 सह अनेक लोकप्रिय स्मार्टफोन्सचा समावेश होता.
2 / 6
दरम्यान, कंपनीनं आता स्मार्टफोन्सची किंमत वाढवल्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. सप्लाय चेनशी निगडीत काही समस्या आणि शिपिंगच्या खर्चात अचानक झालेल्या वाढीमुळे आपल्याला किंमत वाढवावी लागली असल्याचं Xiaomi नं म्हटलं आहे.
3 / 6
इतकंच नाही तर Redmi Note 10 च्या किंमतीत कंपनीनं पाच वेळा वाढ केली आहे. हा स्मार्टफोन कंपनीनं या भारतात या वर्षाच्या सुरूवातीला लाँच केला होता. याची सुरूवातीला किंमत ११,९९९ रूपये इतकी होती.
4 / 6
परंतु आता कंपनीनं या स्मार्टफोनची किंमत वाढवली आहे. याची किंमत वाढवून १३,९९९ रूपये करण्यात आली आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीत कंपनीनं एका महिन्याच्या कालावधीतच दोन वेळा वाढ केली आहे.
5 / 6
जागतिक स्तरावर, सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे भारतातील टॉप स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही ब्रँडवर परिणाम होऊ लागला आहे. रेडमी इंडियाच्या बिझनेस हेड स्नेहा टेनवाला यांनी फायनान्शियल एक्सप्रेस ऑनलाइनला ईमेलद्वारे एक निवेदनही दिलं होतं.
6 / 6
गेल्या काही महिन्यांत संपूर्ण पुरवठा साखळीत कमतरता दिसून आली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात प्रचंड कमतरता असल्यान स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या बहुतांश सुट्या भागांच्या किंमती सातत्यानं वाढवण्यात आल्या असल्याचं त्या म्हणाल्या.
टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनTelevisionटेलिव्हिजन