धक्कादायक...गुगलच्या स्ट्रीट व्ह्यूवर जोडप्याचे 'ते' क्षण कैद झाले; साऱ्या जगाने पाहिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 13:34 IST2019-10-07T13:08:08+5:302019-10-07T13:34:07+5:30

गुगल वाहन चालकांच्या सोईसाठी मॅपवर स्ट्रीट व्ह्यू हा पर्याय देते. मात्र, बऱ्याचदा यामध्ये त्यावेळची छायाचित्रे कैद झालेली असतात. असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. निर्जन रस्त्यावर एक जोडपे कार रस्त्याच्या बाजुला उभी करून सेक्स करत होते. मात्र, त्याचवेळी गुगलचे स्ट्रीट व्ह्यू नोंद करणारा 360 डिग्रीचा कॅमेरा तेथून गेल्याने हा प्रकार कैद झाला आणि गोंधळ उडाला.
गुगलच्या पॉलिसीमध्ये अश्लिलतेला थारा नाहीय. परंतू एका व्यक्तीला कारकडे काहीतरी दिसले, म्हणून त्याने झूम करून पाहिले असता खरा प्रकार उघड झाला. या नंतर हजारो नेटिझन्सनी हा फोटो पाहिला आणि गुगलवरही टीका केली. यानंतर गुगलला हा व्ह्यू ब्लर करावा लागला आहे.
हा व्हायरल झालेला फोटो तायचुंग येथील शांतीयन रोडवरचा आहे. याठिकाणी हे जोडपे कारच्या बॉनेटवर सेक्स करत होते.
अशा प्रकारचे दृष्य या आधीही गुगलच्या कॅमेरामध्ये कैद झाले आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलियातही असे प्रकार घडले आहेत.
गुगलला असे काही आढळल्यास तेथील दृष्ये ब्लर केली जातात. मात्र, गुगलला स्वत:हून हे शोधता येत नाही. कोणी युजरने शोधल्यानंतर गुगलला समजते.
गुगलचा स्ट्रीट व्ह्यू म्हणजे काय असतो, तर एका कारवर 360 डिग्रीचा कॅमेरा बॉल लावलेला असतो. या कॅमेराद्वारे गुगल रस्त्यावरील 360 डिग्रीची दृष्ये टिपते.
एखादा रस्ता पहायचा असल्यास त्याच्या आजुबाजुची दुकानेही पाहू शकतो. हे फोटो 360 डिग्रीमध्ये रोटेटकरून पाहता येतात.