Redmi Note 15 SE भारतात लॉन्च; १७,९९९ रुपयांत मिळणार ५,८००mAh बॅटरी आणि दमदार फीचर्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 13:22 IST2026-04-02T13:19:15+5:302026-04-02T13:22:26+5:30
Redmi Note 15 SE Launched In India: स्मार्टफोन उत्पादक कंपनी रेडमीने आपली बहुप्रतिक्षित 'रेडमी नोट १५ स्पेशल एडिशन' भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे.

फोनमध्ये ६.७-इंचाचा 'कर्व्ह्ड AMOLED' डिस्प्ले असून तो १२०Hz रिफ्रेश रेट आणि ३२०० nits ब्राइटनेसला सपोर्ट करतो. याशिवाय, यात Qualcomm Snapdragon 6 Gen 3 चिपसेट आणि Android 16 आधारित HyperOS 3 देण्यात आले आहे.

फोटोग्राफीसाठी मागील बाजूस ५०MP चा मुख्य कॅमेरा आणि २MP चा डेप्थ सेन्सर असा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला २०MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.

रेडमी नोट १५ स्पेशल एडिशन तीन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज, ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम+ २५६ जीबी स्टोरेज मिळते.

दीर्घकाळ बॅटरी बॅकअप शोधणाऱ्या युजर्ससाठी यामध्ये ५,८००mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी ४५W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

या फोनची मूळ सुरुवातीची किंमत ₹२४,९९९ आहे, परंतु पहिल्या सेलमध्ये (७ एप्रिल) बँक ऑफर्स आणि डिस्काउंटसह हा फोन ₹१७,९९९ च्या प्रभावी किमतीत खरेदी करता येईल. हा फोन Flipkart आणि कंपनीच्या अधिकृत स्टोअरवर उपलब्ध असेल.

















