शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

आता कपडे खरेदी करण्यापूर्वी करा 'ट्राय'; गुगलने भारतात आणले 'व्हर्च्युअल ट्राय-ऑन' टूल; कसे वापरायचं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 19:44 IST

1 / 7
या नवीन फीचरमुळे ऑनलाइन शॉपिंग अधिक सोपी, वैयक्तिक आणि खात्रीशीर होणार आहे. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच भारतीय युजर्सना गुगलवरील ॲपॅरल प्रॉडक्ट लिस्टिंग विभागात एक नवीन Try It On आयकॉन दिसेल. या बटणावर क्लिक करून ग्राहक खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी विविध कपडे व्हर्च्युअली परिधान करून पाहू शकतात.
2 / 7
या फीचरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुगलचे कस्टम एआय मॉडेल. हे मॉडेल केवळ मानवी शरीराचा आकार ओळखते असे नाही, तर कापडाच्या पोतातील बारकावे, जसे की कापूस, लोकर किंवा पॉलिस्टरसारखे साहित्य शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर कसे वळते, ताणले जाते किंवा लटकते हे देखील समजून घेते.
3 / 7
गुगलने ब्लॉग पोस्टमध्ये स्पष्ट केले की, 'तुम्ही तुमचा फक्त एक पूर्ण आकाराचा फोटो अपलोड करून पाहू शकता की एखादा कपडा तुमच्यावर कसा दिसेल. यामुळे ऑनलाइन खरेदीचा सर्वात मोठा अडथळा दूर होतो.'
4 / 7
हे फीचर गुगलच्या 'शॉपिंग ग्राफ' उपक्रमाचा भाग आहे. युजर्संना अब्जावधी कपड्यांच्या लिस्टिंगवर व्हर्च्युअली ट्राय-ऑन करण्याची सुविधा मिळणार आहे. यासाठी गुगल सर्चवर कपड्यांच्या लिस्टिंग ब्राउझ करताना 'Try It On' आयकॉन शोधा आणि टॅप करा.
5 / 7
तुमचा एक पूर्ण आकाराचा फोटो अपलोड करा. चांगल्या परिणामांसाठी, फिटिंगचे कपडे घातलेला आणि चांगल्या प्रकाशातील फोटो अपलोड करणे चांगले ठरेल. काही क्षणांतच, तुम्ही निवडलेले वस्त्र तुमच्या शरीरावर कसे दिसेल, याची अत्यंत वास्तविक व्हिज्युअलायझेशन तयार होईल. तुम्ही तुमचे आवडते व्हर्च्युअल लूक सेव्ह करू शकता किंवा त्वरित मित्रांना पाठवून त्यांचे मत विचारू शकता.
6 / 7
ट्राय-ऑन केल्याशिवाय ऑनलाइन खरेदी करण्यास कचरणाऱ्या भारतीय ग्राहकांसाठी हे फीचर विशेषतः उपयुक्त ठरणार आहे. आता ग्राहक वेगवेगळ्या स्टाईल्सचा प्रयोग करू शकतील, मित्रांकडून त्वरित फीडबॅक घेऊ शकतील आणि 'ट्रायल रूम'चा अनुभव थेट मोबाईलवर घेऊ शकतील.
7 / 7
गुगलने सुरुवातीला महिलांच्या टॉप्सवर लक्ष केंद्रित केले असले तरी, आता ड्रेस, जॅकेट, बॉटम्स आणि शूजचा समावेश करण्यात येत आहे. या नव्या टूलमुळे ग्राहकांना उत्पादनांची अधिक स्पष्ट कल्पना मिळाल्याने किरकोळ विक्रेते आणि ब्रँड्सनाही विक्री वाढवण्यात मदत होण्याची शक्यता आहे.
टॅग्स :googleगुगल