NETFLIX चं नवं फीचर, आता आपणहून डाऊनलोड होणार तुमच्या आवडत्या मुव्हीज आणि शो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 09:06 AM2021-02-23T09:06:24+5:302021-02-23T09:11:48+5:30

Netflix : युझर्सनं दिलेल्या आवडीनुसार आता शो आणि मुव्हीज आपणहून होणार डाऊनलोड

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यामुळे चित्रपटगृहं असतील किंवा नाट्यगृह सर्वच बंद ठेवण्यात आलं होतं. परंतु यावेळी ग्राहकांनी मनोरंजनासाठी ऑनलाईन कंटेन्टचा मार्ग निवडला होता.

लॉकडाऊनच्या कालावधीत किंबहुना त्यापूर्वीपासूनच ओटीटी प्लॅटफॉर्म्सची क्रेझ लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.

नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सनं ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केलं आहे. दरम्यान, सोमवारी नेटफ्लिक्सनं आपल्या युझर्ससाठी ‘Downloads for You’ हे नवं फीचर आणलंय.

‘Downloads for You’ हे फीचर नव्या स्मार्ट डाऊनलोड या फीचरची जागा घेणार आहे. याद्वारे युझर्ससाठी सुचवलेले शो आणि मुव्हीज आपणहून डाऊनलोड होणार आहेत.

सध्या हे फीचर जगातील सर्व अँड्रॉईड युझर्ससाठी सुरू केलं जाणार आहे. त्यानंत आयओएस युझर्ससाठी हे फीचर सुरू करण्यात येईल.

युझर्ससाठी नेटफ्लिक्सकडून सहजरित्या नवा कंटेन्ट शोधं आणि लवकरात लवकर तो पाहणं यासाठी हे फीचर सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे.

स्मार्ट डाऊनलोड फीचरबाबत सांगायचं झालं तर यात तुमच्याद्वारे पाहिला गेलेला एक एपिसोड डिलीट करून त्यानंतर दुसरा एपिसोड डाऊनलोड केला जातो.

याचाच अर्थ यामध्ये मुव्हीज डाऊनलोड करता येत नव्हत्या. परंतु नव्या फीचरमध्ये मुव्हीजही डाऊनलोड होणार आहेत.

‘Downloads for You’ या नव्या फीचरमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या असून नवा कंटेन्ट डाऊनलोड करण्यासाठी हे फीचर तयार करण्यात आलं आहे. यामध्ये मुव्हीजचा देखील समावेश आहे.

नेटफ्लिक्सनं दिलेल्या माहितीनुसार यामध्ये युझर्सच्या आवडीनुसारचा कंटेन्ट आपल्या आपण डाऊनलोड होणार आहे.

‘Downloads for You’ या फीचरच्या मदतीनं युझर्सना आपल्या प्राथमिकतेनुसार डेटा लिमिट निवडता येणार आहे. फीचर अनेबल केल्यानंतर १ जीबी, २ जीबी ते ५ जीबीपर्यंत डेटा डाऊनलोडचा ऑप्शन असेल.

डाऊनलोड झालेला कंटेन्ट पाहण्यासाठी इंटरनेटची गरज भासणार नाही. इंटरनेटशिवायदेखील हा कंटेन्ट पाहता येणार आहे. ही दोन स्टेप प्रक्रिया असल्याचंही नेटफ्लिक्सनं म्हटलं आहे.

सर्वप्रथम युझरला डाऊनलोड टॅबमध्ये जावं लागणार असून ‘Downloads for You’ यावर क्लिक करावं लागेल. यानंतर तुम्हाला कंटेन्टची अमाऊंट सिलेक्ट करावी लागले.

म्हणजेच तुम्ही १ जीबी,२जीबी आणि ५ जीबी पैकी किती कंटेन्ट डाऊनलोड करू इच्छिता हे टाकावं लागेल. त्यानंतर टर्न ऑन वर क्लिक करावं लागेल.

लवकरच iOS वर हे फीचर टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती नेटफ्लिक्सनं दिली. तसंच परंतु हे कधी सुरू होईल याबाबत मात्र कंपनीनं कोणतीही माहिती दिली नाही.