शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Netflix फ्री ऑफर : अकाऊंटशिवाय विनामूल्य पाहा, चित्रपट आणि सीरीज...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 2:05 PM

1 / 8
नेटफ्लिक्स (Netflix) आता आपल्या काही टीव्ही शो आणि चित्रपटांसाठी फ्री अॅक्सेस देत आहे. हे पाहण्यासाठी आपल्याला नेटफ्लिक्सवर अकाऊंट तयार करण्याची किंवा सब्सक्रिप्शन घेण्याची आवश्यकता नाही.
2 / 8
नेटफ्लिक्सच्या या फ्री ऑफर अंतर्गत आपण नेटफ्लिक्सच्या फ्लॅगशिप सीरीज स्ट्रेंजर गेम्ससह (Stranger Games) लोकप्रिय फिल्म बर्ड बॉक्स (Bird Box) पाहू शकता.
3 / 8
या व्यतिरिक्त व्हेन द सी अस, लव्ह इज ब्लाइंड आणि बॉस बेबी सारख्या कॉन्टेंट आहे. दरम्यान, याआधी नेटफ्लिक्सवर अशी ऑफर कधी देण्यात आली नव्हती.
4 / 8
मात्र, कंपनीकडे एक महिन्याचा ट्रायलची ऑफर होती. पण, अकाऊंट तयार करून, क्रेडिट कार्डची डिटेल्स सुद्धा भरावा लागत होता. याशिवाय, कधीकधी कंपनी सीरीजचा एक एपिसोड फ्री करण्यात येत असे.
5 / 8
नेटफ्लिक्सच्या या फ्री ऑफर अंतर्गत एकूण 10 चित्रपट आणि सीरीज आहेत. या पाहण्यासाठी आपण Netflix.com/in/watch-free वर जाऊ शकता. याठिकाणी आपल्याला लॉग इन करणे किंवा साइन अप करण्याची आवश्यकता नाही आणि यापैकी 10 सीरीज आणि चित्रपट थेट पाहू शकतात.
6 / 8
ओटीटी प्लॅटफॉर्म वाढत आहेत. त्यामुळे नेटफ्लिक्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नव-नवीन ऑफर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.
7 / 8
भारतीय मार्केटमध्ये पाहिले तर कंपनीने मोबाईल ऑनली प्लॅन आधीच स्वस्त केले आहेत. अलीकडेच, नेटफ्लिक्सने आपला यूजर इंटरफेस हिंदीमध्येही लाँच केला आहे.
8 / 8
हे केवळ भारतासाठीच नाही तर जगभरही आहे. म्हणजे, कोठेही नेटफ्लिक्सची भाषा बदलून हिंदीमध्ये बदलता येते.
टॅग्स :Netflixनेटफ्लिक्सtechnologyतंत्रज्ञान