सावधान! ३० लाख Android फोन युजर्सला इशारा; फोटो अन् व्हिडीओवर धोक्याचं सावट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 05:02 PM2020-08-10T17:02:01+5:302020-08-10T17:06:39+5:30

अँड्रॉइड फोनमध्ये वापरल्या जाणार्‍या क्वालकॉम चिपने जगभरातील ३० लाख युजर्स डेटा धोकादायक बनला आहे. क्वॉलकॉमच्या डिजिटल सिग्नल प्रोसेसर चिप (डीसीपी) मध्ये चेकपॉईंट सिक्युरिटीच्या संशोधकांना ४०० त्रुटी सापडल्या आहेत

क्वालकॉम चिप (Qualcomm) स्मार्टफोन मार्केटच्या ४० टक्के मध्ये वापरली जाते आणि ती वेगवेगळ्या किंमती श्रेणीच्या फोनमध्ये आढळतात. इतकेच नाही तर क्वालकॉम चिप गुगल (Google), सॅमसंग (Samsung), एलजी, शाओमी आणि इतर बर्‍याच प्रीमियम फोनमध्येही वापरली जाते.

चेकपॉईंटच्या संशोधकांनी डीसीपी चिपची चाचणी केली आणि त्यात ४०० त्रुटी असलेले कोड सापडले. हे सांगण्यात आले होते की, या त्रुटीमुळे, हॅकर्स युजर्सच्या परवानगीशिवाय कोणत्याही स्मार्टफोनमध्ये हेरगिरी करू शकतात.

यामुळे हॅकरला युजर्सच्या गॅलरीतील फोटो, व्हिडिओ, कॉल रेकॉर्डिंग, रिअल टाइम मायक्रोफोन डेटा, जीपीएस आणि स्थान डेटामध्ये सहज प्रवेश मिळतो.

या त्रुटींमुळे कोणत्याही मैलिशस अॅप कॉल रेकॉर्ड करू शकतो किंवा मायक्रोफोनच्या मदतीने हेरगिरी करू शकतो. इतकेच नाही तर हॅकर सर्व्हिस अटॅकद्वारे फोन हँग करु शकतो.

अशा प्रकारे फोनचा डेटा कायमचा राहील. याशिवाय हॅकर आणखी एक धोकादायक कारवाया करु शकतो.

याद्वारे, तो फोनमध्ये मैलवेयर आणि मैलिशियस कोड ठेवू शकतो, जो हॅकरची एक्टिविटी केवळ लपवू शकत नाही तर त्याला हटवताही येणार नाही.

या त्रुटी समोर आल्यानंतर क्वालकॉमकडून इशारा देण्यात आला आहे. केवळ फोन निर्मात्यांकडून अपेडट देऊन या कमतरता दूर केल्या जाऊ शकतात.

त्यासोबतच आम्ही चेकपाँईंटद्वारे शोधलेल्या कमतरतेची चाचणी केली आहे आणि त्यासंदर्भात कारवाई केली आहे, परंतु आतापर्यंत आमच्याकडे पुरावा नाही की कोणी त्याचा फायदा घेतला आहे.

चेकपॉईंटने सर्व मोबाइल फोन युजरकर्त्यांना डिव्हाइस अपडेट करण्यास सांगितले आहे.