भारतात लॉन्च झाला स्वदेशी कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन, किंमत फक्त...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 16:02 IST2025-05-23T15:57:11+5:302025-05-23T16:02:05+5:30
या फोनमध्ये 5000mAh बॅटरीसह 18W फास्ट चार्जिंग सपोर्टही मिळतो.

Lava Shark 5g Price in India: स्वदेशी स्मार्टफोन ब्रँड Lava ने भारतीय बाजारात आपले नवीन फोन्स लॉन्च केले आहेत. कंपनीने Lava Shark 5G सोबत बोल्ड एन1 सीरीज लॉन्च केली आहे. शार्क 5 बद्दल बोलायचे झाले तर, हा हँडसेट 5000 mAH बॅटरी, 4 GB रॅम, 13 MP रियर कॅमेरासह येतो. याशिवाय, कंपनीने आणखी दोन फोन लॉन्च केले आहेत, जे एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये येतात.
लावा शार्क 5जी मध्ये 3.75 इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले मिळतो, जो 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. यात UNISOC T765 प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह येईल. मायक्रो एसडी कार्ड वापरून स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येते.
हा स्मार्टफोन अँड्रॉइड 15 वर काम करेल. फोनमध्ये 13 मेगापिक्सेलच्या मुख्य लेन्ससह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. कंपनीने समोर 5MP चा सेल्फी कॅमेरादेखील दिला आहे. फोनच्या सुरक्षिततेसाठी, त्यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. लावा शार्क 5जी ला पॉवर देण्यासाठी, 5000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.
लावा शार्क 5जी फक्त एकाच कॉन्फिगरेशनमध्ये येतो. यामध्ये तुम्हाला दोन रंगांचे पर्याय मिळतील - स्टेलर गोल्ड आणि स्टेलर ब्लू. हा फोन 4 जीबी रॅम 64 जीबी स्टोरेजमध्ये येतो, ज्याची किंमत 7,999 रुपये आहे. तुम्ही हा फोन विविध प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकता.
याशिवाय, कंपनीने बोल्ड एन1 आणि बोल्ड एन1 प्रो लॉन्च केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन अमेझॉनवर उपलब्ध असतील. कंपनीने लावा बोल्ड एन1 5,999 रुपयांना लॉन्च केला आहे, तर बोल्ड एन1 प्रो 6,669 रुपयांना लॉन्च केला आहे.