Smartphone चार्ज करताना आपणही करता या 5 चुका? लवकर डब्बा होईल बॅटरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 03:45 PM2023-01-04T15:45:00+5:302023-01-04T15:53:50+5:30

बहुतांश स्मार्टफोन्समध्ये Li-Ion (Lithium Ion) बॅटरी वापरल्या जातात. या बॅटरीज साधारणपणे 300 ते 500 चार्ज अथवा डिस्चार्ज सायकलसह येतात.

आजच्या काळात स्मार्टफोनशिवाय कुठलेही काम करणे अवघड झाले आहे. आज मोबाईल बहुतांश कामांमध्ये वापरला जातो. मात्र कालांतराने त्याची बॅटरी खराब होते. बहुतांश स्मार्टफोन्समध्ये Li-Ion (Lithium Ion) बॅटरी वापरल्या जातात. या बॅटरीज साधारणपणे 300 ते 500 चार्ज अथवा डिस्चार्ज सायकलसह येतात.

यानंतर बॅटरीची लाईफ कमी होण्यास सुरुवात होते. याच बरोबर त्यांची कॅपॅसिटीही कमी होऊ लागते. अर्थात फुल चार्ज झाल्यानंतरही बॅटरी पूर्णपणे काम करणार नाही. यासंदर्भात, बॅटरी चार्ज करताना कोणत्या चूक करू नये, हे आम्ही आपल्याला सांगत आहोत.

नेहमी-नेहमी बॅटरी चार्जिंग अलर्टची वाट पाहू नका - अनेक युजर्स फोनकडून अलर्ट मिळाल्यानंतरच बॅटरी चार्चसाठी लावतात. पण नेहमीच बॅटरीचे चार्जींग संपण्याची वाट पाहू नका. फोनकडून अलर्ट मिळण्यापूर्वीच फोन चार्जला लावा. फोन एकाच वेळी पूर्ण चार्ज होण्यापूर्वीही पॉवर प्लगपासून डिस्कनेक्ट केला जाऊ शकतो.

ऑफिशियल चार्जरचाच वापर करा - मोबाईल चार्ज करताना मोबाईलसोबत येणाऱ्या ऑफिशियल चार्जरचाच वापर करायला हवा. मात्र, ओरिजनल चार्जर नसेल तर, कंपॅटेबल चार्जरचा वापर केला जाऊ शकतो. मात्र, सातत्याने दुसरे चार्चर वापरल्यास आपल्या फोनची बॅटरी खराब होऊ शकते.

सॉकेटमधून चार्जर काढत जा - बॅटरी फुल चार्ज झाल्यानंतर, नवे स्मार्टफोन चार्ज होणे बंद होते. मात्र, याचा अर्थ चार्जरही काम करणे बंद करते असे नाही. याच बरोबर मोबाईल चार्ज करताना मोबाईल फोनचा वापर करू नका. यामुळे बॅटरी चार्ज होण्यास उशीर लागतो. डिव्हाईसच्या बॅटरीवर याचा परिणाम होतो.

बॅटरी चार्ज करताना फोनचा वापर करू नका - मोबाईल फोन चार्ज करताना वापरू नका. महत्वाचे म्हणजे मोबाईल चार्ज करताना त्यावर गेम खेळू नका अथवा व्हिडिओही बघू नका. यामुळे बॅटरी फुल कॅपिसिटीने चार्ज होत नाही. याचा परिणाम बॅटरीच्या लाईफवरही होतो.

यामुळेही डॅमेज होते बॅटरी - टेम्परेचरचाही बॅटरीवर मोठा परिणाम होत असतो. हाय टेम्परेचरमुळे बॅटरीवर अधिक स्ट्रेस येतो. यामुळे तिची कॅपेसिटी लवकर कमी होते. यामुळे आपला फोन अधिक गरम असलेल्या रूममध्ये चार्जला लावू नका.