तुमच्या फोनमध्ये इंटरनेट कमी स्पीडमध्ये चालते? 'या' टिप्स वापरून काही मिनिटांतच स्पीड वाढवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 16:52 IST2025-03-29T16:36:35+5:302025-03-29T16:52:37+5:30

अनेकांच्या फोनमध्ये इंटरनेटचे स्पीड हवे तेवढे मिळत नाही. पण, काही टीप्स तुम्ही फॉलो केल्यातर तुमच्या फोनमधील इंटरनेटचे स्पीड वाढू शकते.

अनेकांच्या मोबाईलवर इंटरनेटचे स्पीड पाहिजे तेवढे मिळत नाही. आता स्पीड कमी पडत आहे म्हणून टेन्शन घेऊ नका. अशा काही टिप्स आहेत ज्यामुळे तुमच्या मोबाईलवरील इंटरनेटचे स्पीड वाढणार आहे. खराब इंटरनेट स्पीडमुळे, आपला अनुभव खूप वाईट होतो.

स्लो इंटरनेटमुळे व्हिडीओ स्ट्रीमिंग, सोशल मीडिया ब्राउझिंग आणि गेमिंग सारख्या तुमच्या ऑनलाइन अॅक्टिव्हिटीमध्ये व्यत्यय येऊ शकतो, पण काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमचा इंटरनेट स्पीड पूर्वीपेक्षा जास्त वाढवू शकता.

अनेक वेळा फोनच्या नेटवर्क सेटिंग्जमध्ये समस्या येते, यामुळे इंटरनेटचा स्पीड कमी होतो. यावेळी तुम्ही फोनची नेटवर्क सेटिंग्ज रीसेट करून ते दुरुस्त करू शकता. यासाठी, पहिल्यांदा Settings > System > Advanced > Reset options > Reset Wi-Fi, मोबाइल आणि ब्लूटूथ वर जा आणि नंतर कन्फर्म वर क्लिक करून ते रीसेट करा.

या टीप्स फॉलो केल्यानंतर, तुम्हाला इंटरनेट स्पीडमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसून येईल.

जर तुमच्याकडे ड्युअल सिम डिव्हाइस असेल, तर स्पीड इंटरनेटसाठी तुम्ही योग्य सिम डेटा सिम म्हणून सेट केला आहे का ते तपासा. तसेच, फोन सेटिंग्जमध्ये जा आणि LTE/4G/5G मोड चालू करा जेणेकरून तुम्हाला जलद नेटवर्क मिळेल.

एवढेच नाही तर, तुम्ही फक्त 5G मोड निवडून आणखी चांगल्या गतीचा आनंद घेऊ शकता. या फिचरचा एक तोटा आहे; जर तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे 5G रेंज नाही, तर नेटवर्क पूर्णपणे गायब होईल.

ज्या भागात 5G कव्हरेज स्थिर आणि मजबूत आहे तेथे फक्त 5G मोड वापरणे चांगले. जर तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे 5G नेटवर्क नाही, तर ऑटोमॅटिक नेटवर्क मोड सेट करणे चांगले होईल जेणेकरून तुमचे डिव्हाइस गरजेनुसार 4G किंवा 3G नेटवर्कवर शिफ्ट होऊ शकेल.

अनेक जण नवीन मोबाईल खरेदी केल्यानंतर तो वेळेवर अपडेट करत नाहीत. काही लोक चार महिने फोन अपडेट न करता वापरतात, यामुळे फोनमधील समस्या वाढू लागतात. फोनची कार्यक्षमता सुधारण्यासाठी कंपन्या वेळोवेळी नवीन अपडेट्स जारी करतात.

काही अपडेट्समुळे गोपनीयता सुधारते, काही फोनची कार्यक्षमता आणि नेटवर्क सुधारते, परंतु या अपडेट्सकडे दुर्लक्ष करणे कधीकधी महागात पडू शकते आणि यामुळे तुम्हाला फोनमध्ये कमी इंटरनेट स्पीडचा सामना करावा लागू शकतो. म्हणून, वेळोवेळी तुमचा फोन अपडेट करत रहा.