iPhone 12 Mini वर मिळतेय ८ हजारांची सूट आणि अतिरिक्त डिस्काऊंट; खरेदी करावा का?

Published: June 11, 2021 05:44 PM2021-06-11T17:44:34+5:302021-06-11T17:48:05+5:30

सध्या Amazon वर मिळतेय जबरदस्त डील. याशिवाय मिळतोय अतिरिक्त डिस्काऊंटही.

Apple चा नव्या iPhone 12 Mini अता स्वस्तात खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. यासाठी Amazon वर एक डीलही मिळत आहे.

Amazon वर या डील अंतर्गत ग्राहकांना iPhone 12 Mini वर 8 हजार रूपयांचा डिस्काऊंट देण्यात येत आहे. याशिवाय ग्राहकांना 11 हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काऊंटही मिळणार आहे.

ज्या ग्राहकांना iPhone 12 Mini खरेदी करायचा आहे त्यांना 8 हजार रूपयांची थेट सूट मिळले. परंतु 11 हजार रूपयांचा डिस्काऊंट ग्राहकांना एक्स्चेंज ऑफर अंतर्गत देण्यात येईल.

11 हजार रूपयांचा डिस्काऊंट हा तुमच्या जुन्या फोनची योग्यता पाहून ठरवण्यात येईल. तुमचा फोन कोणता आहे, किती जुना आहे आणि त्याची कंडिशन कशी आहे यावरून 11 हजार रूपयांपर्यंत सूट मिळेल.

iPhone 12 Mini ची अॅमेझॉन इंडियावर 69,900 रूपयांना विक्री करण्यात येत आहे. परंतु ऑफर अंतर्गत तो 61,900 मध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

ही ऑफर iPhone 12 Mini च्या 64 जीबी व्हेरिअंटसाठी आहे. दरम्यान, हा एक कॉम्पॅक्ट स्मार्टफोन आहे. याचाच अर्थ ज्या युझरला छोटा स्क्रिन आवडतो त्यांच्यासाठी हा फोन उत्तम आहे.

iPhone 12 Mini मध्ये 5.4 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच यामध्ये अॅपलाचा फ्लॅगशिप प्रोसेसर Apple A14 Bionic देण्यात आला आहे. iPhone 12 च्या अन्य व्हेरिअंटमध्येही हा प्रोसेसर देण्यात आला आहे.

iPhone 12 Mini मधील एक मोठी समस्या म्हणजे त्याची बॅटरी. यामध्ये कंपनीनं 2227mAh ची बॅटरी दिली आहे. दरम्यान, तुलनेनं या स्मार्टफोनची बॅटरी अधिक काळ टिकत नाही.

जर तुम्हाला बॅटरी बॅकअपची कोणतीही समस्या नसेल आणि तुम्हाला कॉम्पॅक्ट फोन हवा असेल तर तुम्ही या फोनचा विचार करू शकता.

जर तुम्ही अॅपलचे चाहते असाल तर सध्या मोठ्या डिस्काऊंटवर हा फोन खरेदी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. परंतु तुम्हाला जर मोठा स्क्रीन आणि चांगली बॅटरी बॅक अप हवी असेल तर तुम्हाला या किंमतीत अनेक पर्याय उपलब्ध आहेत.