iPhone 12 पंचवीस हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत, Amazon वर ही ऑफर मिस करु नका!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 04:07 PM2022-10-09T16:07:48+5:302022-10-09T16:22:55+5:30

सध्या देशात सणांचे दिवस सुरू आहेत. या पार्श्वभूमिवर Amazon वर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू आहे. अनेक वस्तुंवर या सेलमध्ये मोठी सुट देण्यात आली आहे.

सध्या देशात सणांचे दिवस सुरू आहेत. या पार्श्वभूमिवर Amazon वर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू आहे. अनेक वस्तुंवर या सेलमध्ये मोठी सुट देण्यात आली आहे. फोनमध्ये तर ५० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. हा सेल १६ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.या सेलमध्ये iPhone 12 वरही मोठी सवलत दिली आहे.

या सेल दरम्यान iPhone 12 ची किंमत २० हजार रुपये असणार आहे. तर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचाही लाभ घ्यावा घेता येणार आहे. iPhone 12 च्या सर्व स्टोरेज वेरिएंटवर सूट दिली जात आहे.

Amazon च्या या सेलमध्ये iPhone 12 चे बेस मॉडेल २५ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करु शकता.

सध्या iphone 12 Amazon वर ४७ हजार ९९९ रुपयांना मिळत आहे. किंमत त्याच्या बेस व्हेरियंटसाठी आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 64GB इंटरनल मेमरी आहे. याशिवाय त्यावर बँक सवलतही दिली जात आहे. या फोनवर ICICI बँकेच्या कार्डसह १२५० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. याशिवाय अॅक्सिस बँक आणि सिटी बँक कार्डवरही सूट दिली जात आहे.

कमी एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही फोनची किंमत आणखी कमी करु शकता. यावर कंपनी २५ हजार रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देत आहे. यासोबत फोनची किंमत १२ हजार ७४९ रुपयांपर्यंत खाली आली आहे. यामध्ये बँक सवलत आणि एक्सचेंज ऑफर या दोन्हीचा समावेश करण्यात आला आहे.

एक्सचेंजची किंमत तुमच्या जुन्या फोनवर अवलंबून आहे. iPhone 12 5G तंत्रज्ञानावर काम करते. या फोनमध्ये तुम्ही 5G सेवा सहज वापरू शकता.त्यामुळे आताच्या घडीला हा फोन खरेदी करणे फायद्याचे आहे.