शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WhatsApp स्टेटसमधले फोटो आणि व्हिडीओ सेव्ह करायचेत? कसं ते जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 1:06 PM

1 / 10
स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्राम स्टोरीजप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅपनेही WhatsApp Status हे फीचर आणलं आहे. स्टेटसमध्ये फोटो आणि व्हिडीओ अपलोड केल्यानंतर ते 24 तास असतात. 
2 / 10
मित्र-मैत्रिणींचं स्टेटस अनेकदा आवडतं किंवा ते सेव्ह करण्याची इच्छा होते. मात्र सेव्ह करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने कोणतही फीचर दिलेलं नाही. फोनमध्ये स्टेटस कसं सेव्ह करायचं हे जाणून घेऊया. 
3 / 10
सर्वप्रथम प्ले स्टोरवरून फोनमध्ये Google Files अ‍ॅप डाऊनलोड करा. 
4 / 10
अ‍ॅप ओपन केल्यावर टॉप राईट कॉर्नरला देण्यात आलेल्या मेन्यू ऑप्शनवर क्लिक करा. 
5 / 10
Settings ऑप्शनमध्ये जा. Show hidden files ऑन करा.
6 / 10
Show hidden files ऑन करा.
7 / 10
अ‍ॅपमध्ये पुन्हा जाऊन खाली देण्यात आलेल्या ब्राऊजरवर टॅप करा. टॅप केल्यावर Internal Storage मध्ये जा. 
8 / 10
WhatsApp नावाच्या फोल्डरमध्ये जाऊन Media वर क्लिक करा. 
9 / 10
Statuses असं एक फोल्डर दिसेल. त्यामध्ये आपल्या मित्रमैत्रिणींचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस दिसतील. फोटो अथवा व्हिडीओ ओपन करायचा असल्यास नावापुढे डाऊनलोडच्या चिन्हावर क्लिक करा. 
10 / 10
अनेक ऑप्शन दिसतील. ज्यामध्ये Copy To ऑप्शन सिलेक्ट करा. Internal Storage मध्ये क्लिक करून हवे असलेले फोटो आणि व्हिडीओ फोनमध्ये सेव्ह करा.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान