Blood Oxygen level: ऑक्सिजन लेव्हल चेक करायचीय? स्मार्टवॉच-फिटनेस बँडचा असा करा वापर...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 12:12 PM2021-04-26T12:12:21+5:302021-04-26T12:19:59+5:30

how to check oxygen level on smartwatch: ब्लड ऑक्सिजन लेव्हल तपासणे कोरोना काळात खूप महत्वाचे बनले आहे. जर तुमच्या स्मार्टवॉच किंवा फिटनेस बँडमध्ये SpO2 फिचर असेल तर ते तुम्हाला इनेबल करावे लागणार आहे. याची प्रोसेस आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभराता हाहाकार माजविला आहे. अनेकांना बेड मिळत नाहीएत, तर अनेकांना रेमडेसिवीर, तर कित्येकांना ऑक्सिजन सिलिंडर. दिल्लीत तर ऑक्सिजन सिलिंडर भरण्य़ासाठी पूर्वी जशी एलपीजी भरण्यासाठी रांग लागायची तशी रांग लागली आहे. विमान, रेल्वे अशा जमेल त्या मार्गे आता ऑक्सिजनचे टँकर आणले जात आहेत. 

अशातच अंगावर कोरोना काढणारे आणि नंतर जास्त झाले की हॉस्पिटलची धावाधाव करणारे अनेक असल्याने खरे संकट ओढवू लागले आहे. अशा रुग्णांना श्वास घेण्यास त्रास जाणवल्याने अचानक ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. 

अशावेळी तुम्हाला कोरोनाची बाधा झाली असेल आणि तुमच्या रक्तातील ऑक्सिजन लेव्हल तपासण्यासाठी ऑक्सिमीटर नसेल तर काय करावे. तब्येतीवर लक्ष तर ठेवावेच लागणार आहे. अशावेळी तुम्ही वापरत असलेले स्मार्टवॉच किंवा फिटनेस बँड कामी येणार आहे. 

जर तुमच्याकडे Blood Oxygen level (SpO2) दाखविणारे म्हणजेच ऑक्सिजन लेव्हल दाखविणारा सेन्सर असलेले स्मार्टवॉच किंवा फिटनेस बँड असेल तर तुम्हाला त्याची मदत होणार आहे. 

आता ऑक्सिजन लेव्हल दाखविणारा सेन्सर तुमच्या स्मार्टवॉच किंवा फिटनेस बँडमध्ये आहे हे तुम्हाला कसे कळणार. तर तुम्ही जिथून खरेदी केले ती ई कॉमर्स साईट किंवा तुम्हाला त्या वॉचसोबत मिळालेले माहिती पुस्तक पहावे लागणार आहे. तिथे स्पेसिफिकेशनमध्ये याचा उल्लेख असणार आहे. 

ब्लड ऑक्सिजन लेव्हल तपासणे कोरोना काळात खूप महत्वाचे बनले आहे. जर तुमच्या स्मार्टवॉच किंवा फिटनेस बँडमध्ये SpO2 फिचर असेल तर ते तुम्हाला इनेबल करावे लागणार आहे. याची प्रोसेस आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

काही गोष्टींवर आधी लक्ष द्यावे लागणार आहे. योग्य रितीने बँड तुम्हाला तुमच्या हातावर बांधावे लागणार आहे. SpO2 लेव्हल तपासताना हात एकदम स्थिर ठेवावा. चांगला रिझल्ट मिळण्यासाठी हात सपाट भागावर ठेवावा. लो टेम्परेचर, टॅटू, हात हलविणे आणि गोष्टी मेजरमेंटला बाधित करू शकतात. 

Apple Watch Series 6 मध्ये Blood Oxygen अ‍ॅप वापरण्यासाठी तुमच्या आयफोनमध्ये Health अ‍ॅप असणे गरजेचे आहे. या अ‍ॅपमध्ये ब्राऊझ टॅबवर क्लिक करा. यानंतर Respiratory मध्ये Blood Oxygen वर जाऊन Set up Blood Oxygen ऑप्शनवर जावे. यानंतर Apple Watch जाऊन Blood Oxygen अ‍ॅपद्वारे SpO2 मोजावा. 

डायल इंटरफेसमध्ये जाऊन डाव्याबाजुला स्वाईप केल्यावर अ‍ॅप लिस्ट ओपन करावी. यानंतर ब्लड ऑक्सिजन अ‍ॅप सिलेक्ट करावे. यानंतर ब्लड ऑक्सिजन सॅच्युरेशन ला ब्लड ऑक्सिजन अ‍ॅपद्वारे मोजावे. मेजरमेंनंतर वॉचवर रिझल्ट डिस्प्ले होईल. 

Realme Watch वर SpO2 पेजवर जावे. यानंतर SpO2 चे मेजरमेंट स्टार्ट करावे. यामध्ये जवळपास ३० सेकंदात रिझल्ट दाखविला जातो. 

Fitbit wearables वर SpO2 मोजणी थोडी वेगळी आहे. यासाठी लेटेस्ट Fitbit OS आणि SpO2 क्लॉक फेस असावा लागतो. इन्स्टॉल झाल्यानंतर SpO2 डिफॉल्ट सेट करावा. येथे तुम्हाला सर्व डिटेल्स मिळत राहिल. 

Galaxy Watch 3 मध्ये हे फिचर देण्यात आले आहे. यासाठी तुम्हाला सॅमसंग हेल्थ अ‍ॅप तुमच्या मोबाईलवर ओपन करावे लागणार आहे. पेअर नसेल तर ते पेअर करावे. Galaxy Watch 3 वर जाऊन Galaxy Health अ‍ॅप ओपन करावे. इथे स्ट्रेस ऑप्शन क्लिक करावा. यानंतर SpO2 मोजण्यासाठी Measure बटन क्लिक करावे लागणार आहे. 

Read in English