फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 18:01 IST2025-12-03T17:56:57+5:302025-12-03T18:01:39+5:30
फोनचा पासवर्ड विसरलात तर, काळजी करण्याची गरज नाही! तुम्हाला आता सर्विस सेंटरच्या लांबच लांब रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही.

आजच्या काळात स्मार्टफोन हे केवळ बोलण्याचे साधन नसून, ते आपल्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग बनले आहे. आपले फोटो, व्हिडिओ, बँक ॲप्स, गोपनीय चॅट्स आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट्स याच फोनमध्ये सुरक्षित असतात. अशा परिस्थितीत, जर लॉक स्क्रीनचा पासवर्ड विसरला तर ते एखाद्या भयंकर स्वप्नापेक्षा कमी नसते. पण आता काळजी करण्याची गरज नाही! तुम्हाला आता सर्विस सेंटरच्या लांबच लांब रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचा फोन घरी बसून पुन्हा अनलॉक करू शकता.

जर तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल, तर गुगल तुमची मोठी मदत करू शकते. अनेक वेळा तुम्ही वारंवार चुकीचा पासवर्ड टाकल्यास फोन तुम्हाला ‘Forgot Password’ किंवा ‘Forgot Pattern’ चा पर्याय देतो. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्ही तुमच्या Google Account च्या मदतीने फोन रीसेट करू शकता.

लॉगिन करण्यासाठी फक्त त्याच Gmail ID चा वापर करा, जी तुमच्या फोनमध्ये पूर्वीपासून जोडलेली होती. लॉगिन झाल्यावर फोन फॅक्टरी रीसेट होईल आणि तुम्ही नवीन डिव्हाइसप्रमाणे त्याची सेटिंग करू शकता. या प्रक्रियेत तुमचा जुना डेटा डिलीट होऊ शकतो, त्यामुळे डेटा बॅकअप घेणे आवश्यक आहे.

जर तुमच्या फोनमध्ये ‘Find My Device’ हे फीचर ऑन असेल, तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवरून तुमचा फोन पूर्णपणे रीसेट करू शकता. फक्त गुगलच्या Find My Device वेबसाइटवर जा, तुमचे गुगल अकाउंट लॉगिन करा आणि ‘Erase Device’ चा पर्याय निवडा. यामुळे पासवर्ड हटेल आणि फोन नव्यासारखा सुरू होईल.

जर तुमच्याकडे आयफोन असेल आणि तुम्ही पासकोड विसरला असाल, तर घाबरू नका. ॲपलचे 'Find My iPhone' फीचर तुमच्या मदतीला धावून येईल. कोणत्याही दुसऱ्या डिव्हाइसवर iCloud.com ओपन करा आणि आपल्या Apple ID ने साइन इन करा.

येथे ‘All Devices’ मध्ये तुमचा आयफोन निवडा आणि ‘Erase iPhone’ वर क्लिक करा. यामुळे तुमचा फोन अनलॉक होईल आणि तुम्ही नवीन पासकोड सेट करून तो पुन्हा वापरू शकता. काही फोन कंपन्या त्यांचे अधिकृत PC सॉफ्टवेअर ॲप (उदा. Samsung Smart Switch, Xiaomi Mi PC Suite) देतात, ज्यांच्या मदतीने तुम्ही फोन रीसेट करू शकता. हा मार्ग थोडा तांत्रिक असतो, परंतु सर्विस सेंटरला जाण्याची गरज पडत नाही.

पुढील काळात अशा अडचणी येऊ नयेत यासाठी ही खबरदारी घेणे आवश्यक आहे. महत्त्वाचे पासवर्ड लिहून सुरक्षित ठिकाणी ठेवा किंवा Google Password Managerचा वापर करा. OTP-आधारित बॅकअप अनलॉक, फिंगरप्रिंट अनलॉक आणि फेस अनलॉक यांसारखे अतिरिक्त आणि सोपे पर्याय नक्की सेट करून ठेवा.

















