शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

५० कोटींपेक्षा अधिक Facebook युझर्सचा डेटा लिक; फोन नंबर्ससह 'या' बाबी झाल्या सार्वजनिक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2021 11:26 AM

1 / 15
दिग्गज सोशल मीडिया कंपनी फेसबुक (Facebook) युझर्सच्या डेटा सुरक्षेबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
2 / 15
फेसबुकवर पुन्हा एकदा युझर्सचा गोपनीय डेटा सार्वजनिक झाला आहे. एका रिपोर्टनुसार ५० कोटींपेक्षा अधिक युझर्सचा डेटा लिक झाला आहे. यामध्ये सहा दशलक्ष भारतीयांच्या डेटाचाही समावेश असल्याचं म्हटलं जात आहे.
3 / 15
डेटा लिक झाल्याचा आरोप कंपनीवर पहिल्यांदाच करण्यात येत नाहीये. यापूर्वीही अशा बाबींमुळे फेसबुकवर आरोप करण्यात आले होते.
4 / 15
एका रिपोर्टनुसार सध्या फेसबुकच्या ५० कोटींपेक्षा अधिक युझर्सचा डेटा लिक झाला आहे. रिपोर्टनुसार यामध्ये युझर्सचे फोन क्रमांक, ईमेल अॅड्रेस यांसह खासगी माहितीचा समावेश आहे.
5 / 15
ही सर्व माहिती सार्वनजिक झाली आहे. फेसबुकच्या युझर्सच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागल्यानंतर कंपनीनं हा रिपोर्ट जुना असल्याचा दावा केला आहे.
6 / 15
अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार फेसबुकवरील ५० कोटींपेक्षा अधिक युझर्सचा डेटा हॅकर्सच्या हाती लागला आहे आणि याचे दुष्परिणाम युझर्सला भोगावे लागू शकतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
7 / 15
रिपोर्टनुसार ही माहिती २०१९ मध्ये युझर्सच्या हाती लागल्याचं सांगण्यात आलं आहे. यामध्ये युझर्सचे फोन क्रमांक, ईमेल, बँक अकाऊंट नंबर आणि अन्य गोपनीय माहितीचा समावेश आहे.
8 / 15
हडसन रॉक सायबर क्राईम इंटेलिजन्स फर्मचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर अॅलोन गेल यांनी शनिवारी एका ट्वीटद्वारे ५३ कोटी ३० लाख युझर्सचा डेटा हॅकर्सच्या हाती लागल्याचा दावा केला आहे.
9 / 15
बिझनेस इन्सायडरच्या रिपोर्टनुसार लिक झालेल्या डेटामधील माहिती ही नवी आहे. जर तुम्ही फेसबुक वापरत असाल तर तुम्ही फेसबुकवर दिलेला फोन क्रमांक लिक झाल्याची शक्यता आहे असा दावा गेल यांनी केला आहे.
10 / 15
अॅलन गेल यांनी डेटा लिकबाबत फेसबुकवर टीका केली आहे. तसंच हा फेसबुकचा निष्काळजीपणा असल्याचं म्हटलं.
11 / 15
त्यानंतर अनेकांनी फेसबुकच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
12 / 15
फेसबुकनंही यावर स्पष्टीकरण देत हा जुना अहवाल असल्याचं म्हटलं. तसंच याची माहिती आम्हाला ऑगस्ट २०१९ मध्ये मिळाली होती आणि ते ठीकही करण्यात आलं होतं असं फेसबुकनं नमूद केलं.
13 / 15
हॅकर्सनं डेटा मिळवल्यानंतर तो विकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अॅलन गेल यांनी याबाबत ट्वीट केलं.
14 / 15
अमेरिकेतील ३.२ कोटी युझर्सचा आणि फ्रान्समधील २ कोटींपेक्षा अधिक युझर्सची खासगी माहिती जसं की त्यांचा पत्ता, फोन क्रमांक, रिलेशनशिप स्टेटस, जन्मतारीख विकण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसंच अन्य काही माहितीही विकण्याचा प्रयत्न झाल्याचे ते म्हणाले.
15 / 15
यापूर्वीही २०१६ मध्ये ब्रिटीश कन्सल्टन्सी फर्म केम्ब्रिज अॅनालिटीकानं राजकीय जाहिरातींसाठी लाखो फेसबुक युझर्सचा डेटा लिक केला होता. त्यानंतर फेसबुकला कायदेशीर प्रक्रियेतूनही जावं लागलं होतं.
टॅग्स :Facebookफेसबुकcyber crimeसायबर क्राइमSocial Mediaसोशल मीडियाIndiaभारतAmericaअमेरिकाFranceफ्रान्स