CoronaVirus Live Updates : अरे व्वा! IIIT च्या विद्यार्थ्यांची कमाल, फक्त 2 मिनिटांत कळणार रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह

Published: May 6, 2021 12:48 PM2021-05-06T12:48:29+5:302021-05-06T13:00:50+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाला हरवण्यासाठी सर्वच स्तरांतून प्रयत्न केले जात आहेत.

देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतच्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्येने 2 कोटीचा टप्पा पार केला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना धडकी भरवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर येत आहे.

रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने चिंतेत भर पडत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने गेल्या काही महिन्यांतील उच्चांक गाठला आहे.

गुरुवारी (6 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 4,12,262 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2,10,77,410 वर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 23,01,68 वर पोहोचला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. तसेच जगभरात कोरोनावर संशोधन सुरू असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे.

कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाला हरवण्यासाठी सर्वच स्तरांतून प्रयत्न केले जात आहेत. डॉक्टर्स, फ्रंटलाइन वर्कर आपल्या पूर्ण ताकदीने याला टक्कर देत आहेत. करोनाला हरवण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका आहे ती म्हणजे टेस्टिंगची.

सध्या कोरोना चाचणी करणे महत्त्वाचे आहे. टेस्टिंग लवकर करणे हे खरंच आव्हानात्मक आहे. मात्र याच दरम्यान बिहारमधील IIIT च्या विद्यार्थ्यांनी कमाल केली आहे. अनोखं सॉफ्टवेअर तयार केलं आहे.

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कोरोना आहे की नाही, हे अवघ्या दोन मिनिटांत समजणार आहे. या सॉफ्टवेयरच्या मदतीने रुग्णांच्या छातीचा एक्सरे काढला जातो. त्यानंतर सिटी स्कॅन केलं जातं.

एक्स रे आणि सिटी स्कॅन हे दोन्ही रिपोर्ट पाहून अवघ्या काही सेकंदात एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह याची माहिती मिळते. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून फक्त कोरोना नव्हे तर टीबी, व्हायरल आणि बॅक्टेरियल निमोनिया सह सामान्य रुग्णांचा एक्सरे प्लेटवरून माहिती मिळते.

या अविष्कारला मान्यता देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ICMR ने यासाठी सल्लागार समितीची स्थापना केली आहे. पटणा एम्समध्ये या सॉफ्टवेयरची टेस्टिंग सुरू करण्यात आली आहे.

एम्समध्ये पुढील 2 ते 3 दिवसांत अनेक कोरोना रुग्णांचा एक्सरे आणि सिटी स्कॅन इमेजची तपासणी कोरोना डिटेक्टिंग सॉफ्टवेअरद्वारे केली जात आहे. यानंतर रुग्णांच्या आलेल्या निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह रिपोर्टचा सल्लागार समिती अभ्यास करणार आहे.

रिपोर्ट ICMR ला पाठवला जाणार आहे. पुढील आठवड्यापर्यंत याच्या मान्यतेसंबंधी निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ही 35,66,398 आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत दोन लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर या संकटात दिलासादायक बाब म्हणजे 1,72,80,844 लोकांनी कोरोनावर मात केली असून ही लढाई जिंकली आहे.

केंद्र सरकारच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांनी देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा दिला आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देशातील करोनाची सध्याची परिस्थिती आणि भविष्यातील परिस्थिती याविषयी माहिती दिली.

केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी नवी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं आहे. भारतात करोनाची तिसरी लाट येणं अटळ आहे असं म्हटलं आहे.

"सध्याची रुग्णवाढ आणि कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार पाहाता ते होणार आहे. पण फक्त ही तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगता येणं कठीण आहे. आपण या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहायला हवं" असं राघवन यांनी म्हटलं आहे.