जबरदस्त! केवळ १० हजार रुपयांत खरेदी करा फास्ट चार्जिंग स्मार्टफोन्स; 'हे' आहेत उत्तम पर्याय

By देवेश फडके | Published: January 9, 2021 03:33 PM2021-01-09T15:33:53+5:302021-01-09T15:40:24+5:30

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्यांनी अधिक क्षमतेची बॅटरी आणि फास्ट चार्जिंगची सुविधा या दोन्ही गोष्टी असणारे स्मार्टफोन्स कमी किमतीत उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता अगदी केवळ १० हजार रुपयांमध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा असणारे स्मार्टफोन्स उपलब्ध झाले आहेत. पाहूया...

नवी दिल्ली : दिवसेंदिवस विविध प्रकारच्या स्मार्टफोन्सची क्रेझ तरुणांमध्ये वाढताना दिसत आहे. भारतीय बाजारात अनेकविध कंपन्यांचे स्मार्टफोन्स लॉन्च होताहेत. प्रत्येक कंपनी भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या स्मार्टफोन्समध्ये अनेक सुविधा देत आहेत. भारतीय बाजारपेठेत मोबाइल कंपन्यांमध्ये कमालीची चढाओढ पाहायला मिळत आहे. कमी किमतीत उत्तमोत्तम सुविधा देण्याकडे मोबाइल कंपन्यांचा कल वाढला असून, तीव्र स्पर्धेचा लाभ भारतीय ग्राहकांना मिळत आहे.

धकाधकीच्या जीवनामुळे माणसाला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. हीच मोबाइल चार्जिंगच्या बाबतीतही घडताना दिसते. मोबाइलची बॅटरी कमी आहे, अशी तक्रार दिवसातून अनेकवेळा विविध व्यक्तींकडून आपल्याला ऐकायला मिळत असते. दिवसभरातील बहुतांश वेळ हा स्मार्टफोन हाताळण्यात जात असतो. स्मार्टफोन्सचा वापर वाढल्यामुळे बॅटरी लवकर संपते.

स्मार्टफोन्स युझरची ही तक्रार दूर करण्याचा जवळपास सर्वच कंपन्या प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अधिक क्षमतेची बॅटरी देण्याचा कलही वाढताना दिसून येत आहे. मात्र, अधिक क्षमतेची बॅटरी चार्ज करताना वेळही अधिक जाणारच. यावरही उपाय म्हणून बहुतांश कंपन्यांनी फास्ट चार्जिंगची सुविधा ग्राहकांना दिली आहे. भारतीय बाजारपेठेत फास्ट चार्जिंग सुविधा असणारे अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत.

अधिक बॅटरी क्षमता आणि फास्ट चार्जिंगची सुविधा हे दोन्ही पर्याय हवे असल्यास ग्राहकाला किंमतही जास्त मोजावी लागणार हे आलेच. मात्र, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्यांनी अधिक क्षमतेची बॅटरी आणि फास्ट चार्जिंगची सुविधा या दोन्ही गोष्टी असणारे स्मार्टफोन्स कमी किमतीत उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता अगदी केवळ १० हजार रुपयांमध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा असणारे स्मार्टफोन्स उपलब्ध झाले आहेत. पाहूया...

Samsung Galaxy M11 हा स्मार्टफोन ९ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन ५००० एमएएच बॅटरीसह उपलब्ध असून, याला फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. ६.४ इंचाचा डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ४५० चा प्रोसेसर, ३२ जीबी इंटरनल मेमरी, ट्रिपल कॅमेरा सेटअप अशा अनेकविध अद्ययावत सुविधा या स्मार्टफोनमध्ये देण्यात आल्या आहेत.

Samsung Galaxy M02s हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत ८ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये ५००० एमएएच बॅटरी देण्यात आली असून, याला फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. ६.५ इंचाचा वॉटरड्रॉप-स्टाइल नॉच टीएफटी डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ४५० चा प्रोसेसर, ३२ जीबी इंटरनल मेमरी, ३ जीबी रॅम, ट्रिपल कॅमेरा सेटअप अशा अनेकविध अद्ययावत सुविधा या स्मार्टफोनमध्ये देण्यात आल्या आहेत. तसेच या स्मार्टफोनचे ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल मेमरी असलेले व्हेरियंट ९ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे.

Xiaomi Redmi 9 Prime हा स्मार्ट फोन ९ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये ५०२० एमएएच बॅटरी क्षमता देण्यात आली असून, 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. ६.५३ इंचाचा डिस्प्ले, ६४ जीबी इंटरनल मेमरी, ४ जीबी रॅम, ट्रिपल कॅमेरा सेटअप अशा अनेकविध अद्ययावत सुविधा या स्मार्टफोनमध्ये देण्यात आल्या आहेत.

Realme C15 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत ९ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये ६००० एमएएच बॅटरी देण्यात आली असून, 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. ६.५ एचडी प्लस इंचाचा डिस्प्ले, ३२ जीबी इंटरनल मेमरी, ३ जीबी रॅम, ट्रिपल कॅमेरा सेटअप अशा अनेकविध अद्ययावत सुविधा या स्मार्टफोनमध्ये देण्यात आल्या आहेत. या स्मार्टफोनचे ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल मेमरी असलेले व्हेरियंट १० हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे.

५००० एमएएच बॅटरीसह उपलब्ध असलेला Xiaomi Redmi 8A हा स्मार्टफोन ६ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध असून, याला 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. ६.५ एचडी प्लस इंचाचा डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ४३९ चा प्रोसेसर, ३२ जीबी इंटरनल मेमरी, २ जीबी रॅम, ट्रिपल कॅमेरा सेटअप अशा अनेक सुविधा या स्मार्टफोनमध्ये देण्यात आल्या आहेत. याच स्मार्टफोनचे ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल मेमरी असलेले व्हेरियंट ७ हजार ४९९ रुपयांना उपलब्ध आहे.