ChatGPT ने दोन मुलांच्या हत्येसाठी वडिलांना धरलं दोषी; २१ वर्षाची शिक्षाही सुनावली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 18:03 IST2025-03-24T17:55:39+5:302025-03-24T18:03:44+5:30
ChatGPT ने एका बापालाच दोन मुलांच्या हत्येसाठी दोषी ठरवून शिक्षा दिल्याने खळबळ उडाली आहे.

नॉर्वेच्या एका व्यक्तीने चॅटजीपीटी बनवणाऱ्या OpenAI कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. चॅटजीपीटीने एका प्रश्नाला उत्तर देताना त्यालाच दोन मुलांचा खुनी ठरवलं होतं.
महत्त्वाचे म्हणजे चॅटबॉटने प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला मुलांच्या खुनांसाठी दोषी ठरवण्यात आले असून तो २१ वर्षांपासून तुरुंगात असल्याचेही सांगितले.
आर्वे हजलमार होल्मेन नावाच्या व्यक्तीने याविरोधात तक्रार दाखल केली आहे. एके दिवशी त्याने चॅटजीपीटीला स्वतःबद्दल माहिती विचारली होती. त्याने, “अर्वे हजलमार होल्मेन कोण आहे?” असं चॅटजीपीटीला विचारला.
यावर आर्वे हजलमार होल्मन नॉर्वेजियन आहे. एका दुःखद घटनेमुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांना दोन मुलं होती. पहिला मुलगा दहा वर्षांचा आणि दुसरा सात वर्षांचा. दोन्ही मुले डिसेंबर 2020 मध्ये नॉर्वेच्या ट्रॉन्डहेम येथे त्यांच्या घराजवळील तलावात मृतावस्थेत आढळून आली होती. या घटनेने संपूर्ण देश हादरला. हॉलमनला त्याच्या दोन्ही मुलांच्या हत्येप्रकरणी २१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली, असं चॅटजीपीटीने सांगितले.
यासंदर्भात आर्वे यांनी आपली तक्रार 'डेटा प्रोटेक्शन अथॉरिटी'कडे केली आहे. त्यांनी चॅटजीपीटी हे धोकादायक असल्याचे म्हटलं. याचे कारण हे उत्तर पूर्णपणे खरे किंवा पूर्णपणे खोटे नाही. वास्तविक, चॅटजीपीटीने त्याचा वैयक्तिक माहिती वापरून आर्वेबद्दल काही माहिती गोळा केली आणि नंतर ती वाढवून सांगितली.
चॅटजीपीटीने आर्वेच्या शहराचे नाव, दोन मुलांचे वय बरोबर सांगितले. पण माझ्यावर कधीही कोणत्याही गुन्ह्याचा आरोप नाही, मग मी दोषी कसा ठरेल, असे आर्वेने तक्रारीत म्हटलं आहे.
तक्रारदाराने OpenAI ला ही चुकीची माहिती काढून टाकण्यास सांगितले आहे. तसेच कंपनीला दंड ठोठावण्याची मागणी करण्यात आली आहे.